मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /दावा केलेलं मायलेज आणि प्रत्यक्ष मायलेज यात काय फरक असतो?

दावा केलेलं मायलेज आणि प्रत्यक्ष मायलेज यात काय फरक असतो?

नवीन कार विकत घेताना तुम्हाला कंपनी सांगते ते मायलेज (Car Mileage) कित्येकवेळा प्रत्यक्षात मिळत नाही, मग तुमची गाडी नक्की किती मायलेज देते याचा हिशोब कसा करायचा?

नवीन कार विकत घेताना तुम्हाला कंपनी सांगते ते मायलेज (Car Mileage) कित्येकवेळा प्रत्यक्षात मिळत नाही, मग तुमची गाडी नक्की किती मायलेज देते याचा हिशोब कसा करायचा?

नवीन कार विकत घेताना तुम्हाला कंपनी सांगते ते मायलेज (Car Mileage) कित्येकवेळा प्रत्यक्षात मिळत नाही, मग तुमची गाडी नक्की किती मायलेज देते याचा हिशोब कसा करायचा?

  मुंबई, 19 एप्रिल : शिक्षण झाल्यानंतर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय सुरु करता. यात तुम्ही अपार कष्ट करुन दोन पैसे मिळवता आणि त्यातील काही वाटा बचत करता. या बचतीतून चारचाकी गाडी घेण्याचं तुमचं स्वप्न असतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही शोरुममध्ये जाता आणि तेथील सेल्स पर्सनकडे (Sales Person)इंधनाचा कार्यक्षम वापर (Mileage)करणाऱ्या कारबाबत चौकशी करता. यावेळी सेल्स पर्सन यासंदर्भात एआरएआयव्दारे (ARAI)प्रमाणित असणारी आकडेवारी तुम्हाला सांगतो. तुम्ही आनंदाने कार खरेदी करता आणि घरी येता. त्यानंतर त्या कारने तुमचा दैनंदिन प्रवास सुरु होतो. हा प्रवास 90 टक्के घर ते ऑफिस आणि पुन्हा घर इतकाच असतो.

  त्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की कंपनीनं सांगितलेलं मायलेज आपली कार आपल्याला देत नाहीये. त्यामुळे पहिल्या फ्री सर्व्हिसिंग (Free Servicing) दरम्यान तुम्ही ही समस्या मॅकेनिकला सांगता. हे नवे इंजिन आहे. ते ओपनअप होऊन तुम्हाला अपेक्षित मायलेज(Mileage)मिळायला वेळ लागेल, असे तो मॅकेनिक सांगतो. तथापि तो असाही दावा करतो की, जे मायलेज तुम्हाला सांगण्यात आले आहे, ते मिळेलच याची खात्री बाळगू नका. त्याचे हे बोलणं ऐकून तुम्ही वैतागता आणि गाडी सुरु करुन निघता. यावेळी तुमच्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे मायलेजचा जो आकडा आपल्याला सांगितला गेला आहे, तो नाही तर किमान त्यातुलनेत 20 टक्के तरी मायलेज मिळावे. ज्या व्यक्ती शहरात कार चालवण्यापेक्षा महामार्गावर अधिक ड्रायव्हिंग करतात, त्यांना तुलनेने ड्रायव्हिंग कालावधीत चांगले मायलेज मिळते. याबाबत वैतागून तुम्ही तुमचे कुटुंबीय, मित्र, सहकाऱ्यांशी चर्चा करता, सोशल मिडीयावरुन देखील आपली नाराजी व्यक्त करता. मात्र तुम्हा सर्व बाजूंनी एकच उत्तर मिळते, ते म्हणजे वास्तविक मायलेज (Actual Mileage) हे दावा केलेल्या मायलेजपेक्षा (Claimed Mileage)वेगळे असते.

  तुम्हाला दिल्ली सरकार आणि टाटा नेक्सन फियास्को (Tata Nexon Fiasco)यांच्यात घडलेला प्रकार नक्कीच आठवत असेल. एका ग्राहकाने टाटा नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) ही कार खरेदी केली. कार खरेदी करते वेळी त्या ग्राहकाला पूर्ण बॅटरी चार्ज केल्यावर 312 किलोमीटर मायलेज मिळेल असं सांगण्यात आलं. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला 200 किलोमीटर मायलेज मिळालं. दिल्ली ईव्ही पॉलिसीअंतर्गत नेक्सन ईव्हीला दिल्ली सरकारकडून (Delhi Government) अनुदान दिले जात असल्याने, तो ग्राहक आपच्या नेतृत्वाखालील सरकार कडे गेला. कारण सरकारने कारला अनुदानातून वगळले होते. त्यानंतर नाखूष टाटा मोटार्सने दिल्ली उच्च न्यायलयात धाव घेतली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. टाटा मोटर्सने आपल्या अधिकृत निवेदनात याबाबत म्हटले की नेक्सन ईव्ही साठी सिंगल फूल चार्जच्या (312 किलोमीटर) मर्यादेबाबत आटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया कडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ही संस्था स्वतंत्रपणे सर्व वाहनांची चाचणी घेते. प्रमाणित किंवा परिभाषित चाचणी स्थितीत वाहने ग्राहकांना ऑफर देण्यापूर्वीच उत्पादित केली जातात.

  पारंपारिक वाहनांप्रमाणे (आयसी इंजिनसह) ईव्ही श्रेणीचा परफॉर्मन्स हा देखील एसीचा वापर, वैयक्तिक ड्रायव्हिंग पद्धती, वाहनाची प्रत्यक्ष स्थिती यावर अवलंबून असतो. ही नवीन श्रेणीची कामगिरी नवीन तंत्रज्ञानावर अवलंबून असते. ग्राहक या तंत्रज्ञानाशी फॅमिलीअर झाल्यानंतर म्हणजेच 4 ते 6 आठवड्यानंतर 10 टक्क्यांवर सुधारणांबाबत अहवाल देतात.

  तुम्ही तुमच्या मित्रांकडे किंवा ऑनलाईन समस्या मांडल्यानंतर त्यांनी वास्तविक मायलेज हे दावा केलेल्या मायलेजपेक्षा भिन्न असते असे सांगितले. तेच टाटा मोटर्सचे देखील म्हणणे आहे. याचा साधा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष विरुद्ध दावा केलेल मायलेज होय.

  दावा केलेले मायलेज

  दावा केलेला मायलेजचा आकडा हा तुम्हाला ज्या कंपनीने गाडीचे उत्पादन केले आहे, त्या कंपनीकडून दिला जातो. परंतु या आकड्याची तपासणी आणि प्रमाणीकरण सरकारची सहकारी संस्था आणि ऑटो संबंधित उत्पादनांचे मुल्यांकन करण्याकरिता संशोधन आणि विकास कार्य करणारी एआरएआय ही संस्था करते. एआरएआय़ वाहनांची प्रत्यक्ष रस्त्यांवर चाचणी घेत नाही. परंतु, रस्त्यांच्या स्थितीच्या प्रतिकृती नुसार चेसिज डायनामामीटरचा (Chassis Dynamometer)वापर करते.

  प्रत्यक्ष मायलेज

  प्रत्यक्ष मायलेज हे दावा केलेल्या मायलेजच्या अगदी विरुध्द असते. प्रत्यक्ष मायलेज हे कार ड्रायव्हिंग करताना तुम्हाला समजते. एआरआयएने मंजूर केलेल्या मायलेजच्या आकड्यांपेक्षा वास्तविक मायलेज हे कमीच असते. हा अनुभव वर्षानुवर्षे कायम आहे. मायलेजचे हे आकडे तुमची ड्रायव्हिंग स्टाईल, स्थिती, रस्त्यांची स्थिती, हवामान आदी घटकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती सातत्यानं महामार्गांवर ड्रायव्हिंग करीत असेल तर, त्याला शहरातील ट्रॅफिकमध्ये सातत्यानं ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त मायलेज मिळते.

  कोणते मायलेज आपण ग्राह्य धरावे

  एआरएआयचे मायलेज बघा आणि त्या संख्येतून 20 टक्के आकडा वजा करा. एआरएआय नुसार जर तुमची कार 20 केएमपीएल एवढे मायलेज देईल, असे सांगितले गेले असले तर तुम्हाला प्रत्यक्षात 16 केएमपीएल मायलेज मिळेल. परंतु, तुमचा इंधनाचा वापर समजून घेण्याकरिता हे अतिशय रहस्यमय असे मत आहे. वर नमुद केल्याप्रमाणे ही बाब अनेक घटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे वास्तविक मायलेजचा आकडा तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीच्या मीटरवर लक्ष ठेवावे लागेल.

  First published:
  top videos

   Tags: Actual mileage, Car, Free servicing, Mileage, Petrol and diesel