मुंबई, 8 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ग्राहक आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. सीएनजी वाहनांनी भारतात चांगला जम बसवला आहे. सीएनजीच्या किमतीतही वाढ झालेली असली, तरी पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ती कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगलं मायलेज असलेली सीएनजी वाहनं पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत नक्कीच जास्त फायद्याची ठरू शकतात. सीएनजी कार्सच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कार उत्पादक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन सीएनजी मॉडेल्स समाविष्ट करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना या सेगमेंटमध्ये बरेच पर्याय मिळू लागले आहेत. आता मार्केटमध्ये लेटेस्ट फीचर्स असलेल्या अनेक सीएनजी कार्स उपलब्ध आहेत. त्याबद्दल माहिती घेऊ या. टाटा टियागो/टिगॉर सीएनजी टाटा टियागोची किंमत 6 लाख 30 हजार रुपये ते 7 लाख 82 हजार रुपये या टप्प्यात आहे. टिगॉरची किंमत 7 लाख 40 हजार रुपये ते 8 लाख 84 हजार रुपये या रेंजमध्ये आहे. या दोन्ही कार्समध्ये 14-इंच हायपरस्टाइल व्हील, एलईडी डीआरएल, ऑटोमॅटिक हेडलॅम्प (टिगॉर), 7-इंच टचस्क्रीन सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 8-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटो एसी, ऑटो-फोल्डिंग ओआरव्हीएम, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, रियर पार्किंग कॅमेरा आणि रेन सेन्सिंग वायपर्स (टिगॉर) यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. ह्युंदाई ऑरा/ग्रँड आय10 निऑस सीएनजी- ह्युंदाई ऑराची किंमत 7 लाख 88 हजार रुपयांपासून ते 8 लाख 57 हजार रुपयांपर्यंत आहे. ग्रँड आय10 निऑसची किंमत 7 लाख 16 हजार रुपयांपासून ते 8 लाख 45 हजार रुपयांपर्यंत आहे. या गाड्यांमध्ये एलईडी डे टाईम रनिंग लॅम्प, 15-इंच अलॉय व्हील, 8-इंच टचस्क्रीन सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, फ्रंट आणि रिअर यूएसबी चार्जर, ऑटो एसी (i10 Nios), कूल्ड ग्लोव्ह बॉक्स (i10 Nios), प्रोजेक्टर फॉग लॅम्प आणि रिअर पार्किंग कॅमेरा ही फीचर्स मिळतात. हेही वाचा: ‘या’ 5 कारवर भारतीय फिदा, खरेदी करण्यासाठी लागतायेत रांगा मारुती डिझायर/स्विफ्ट सीएनजी- डिझायरची किंमत 8 लाख 23 हजार रुपये ते 8 लाख 91 हजार रुपयांपर्यंत आहे. स्विफ्टची किंमत 7 लाख 77 हजार रुपये ते 8 लाख 45 हजार रुपये इतकी आहे. या कारमध्ये अलॉय व्हील्स, 7-इंच टचस्क्रीन सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, इंजिन पुश स्टार्ट-स्टॉप बटण, ऑटो एसी, ड्युएल फ्रंट एअरबॅग्ज आणि फॉग लॅम्प यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. डिझायर सीएनजीचं मायलेज 31.12 किमी आहे आणि स्विफ्ट सीएनजीचं मायलेज 30.90 किमी आहे. मारुती बलेनो सीएनजी- या गाडीची किंमत 8 लाख 28 हजार ते 9 लाख 21 हजार रुपये आहे. यात LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटो हेडलॅम्प, 16-इंच अलॉय व्हील्स, रियर फास्ट चार्जिंग (ए आणि सी टाइप), पुश बटण स्टार्ट-स्टॉप, ऑटो एसी, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील, 7-इंचाचा टचस्क्रीन सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, ऑनबोर्ड व्हॉइस असिस्टंट, रिमोट कार फंक्शन, सहा एअरबॅग्ज आणि रिअर पार्किंग कॅमेरा ही फीचर्स मिळतात.
मारुती एक्सएल6 सीएनजी- या गाडीची किंमत 12 लाख 24 हजार रुपये इतकी आहे. यात एलईडी हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, 16-इंच अलॉय व्हील, ऑटो एसी, इंजिन पुश स्टार्ट-स्टॉप बटण, क्रूझ कंट्रोल, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील, 7-इंच टचस्क्रीन सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, चार एअरबॅग, हिल होल्डसह ईएसपी आणि रिअर पार्किंग कॅमेरा सारखे फीचर्स मिळतात. ही देशातली सर्वांत महागडी सीएनजी कार आहे. मारुतीनं नुकतीच बलेनो सीएनजी ही कारही लाँच केली आहे. सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात या सीएनजी कार्स चांगला पर्याय ठरू शकतात.