मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /रिक्षातला प्रवास अन् सुचली कल्पना, तिघांनी बनवलं वेळ वाचवणारं अ‍ॅप, मिळाले तब्बल 67 लाख रुपये

रिक्षातला प्रवास अन् सुचली कल्पना, तिघांनी बनवलं वेळ वाचवणारं अ‍ॅप, मिळाले तब्बल 67 लाख रुपये

तीन मित्रांची कमाल

तीन मित्रांची कमाल

आता तुमचा हा वेळ वाचू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Noida, India

नोएडा, 26 फेब्रुवारी : जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनात पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी भरण्यासाठी जाता तेव्हा गर्दीमुळे तुमचा वेळ वाया जात असेल. त्यामुळे तुमची अनेक कामे उशिराने होत असतील किंवा राहून जात असतील. मात्र, आता तुमचा हा वेळ वाचू शकतो. नोएडातील तीन मित्र वैभव, आलाप आणि आर्यन यांनी एक अ‍ॅप तयार केले आहे जे तुमच्या या समस्येला नक्कीच दूर करेल. आता या तिन्ही मित्रांनी शार्क टँक इंडियाकडून निधीही मिळाला आहे.

वैभवने 2020 मध्ये त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये आलाप, आर्यन या दोन मित्रांसोबत नवगती कंपनी सुरू केली. नवगती अ‍ॅप भारतात कुठेही तुमच्या जवळच्या इंधन स्टेशनवरील गर्दी, कर्मचारी, सुविधा इत्यादींची माहिती देते. वैभव सांगतात की, मी BITS पिलानी मध्ये शिकायचो, कॉलेजच्या कामामुळेच मी ऑटोने प्रवास करायचो. मात्र, ऑटोवाले मोठ्या समस्या सांगायचे की इंधन टाकताना खूप वेळ लागतो. ज्यामुळे याबाबतची माहिती मिळाली असती, ती गोष्ट आम्ही नक्कीच केली असती, असेही ते सागायचे. तेव्हाच माझ्या मनात हे आलं, त्यानंतर आम्ही तिघांनी कॉलेजमधून 7 लाख रुपयांचा निधी घेतला आणि नवगती सुरू केली, असे वैभव सांगतात.

Success Story : शिक्षणासाठी 6 किमी पायी प्रवास, शेतामध्येही केले काम, IPS सरोज कुमारी यांचा यशस्वी प्रवास

कशाप्रकारे करतो काम -

हे अ‍ॅप सर्वसामान्यांसाठी मोफत आहे. ते प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. त्यानंतर लॉगिन करून सेवा घेता येईल. सध्या आमच्याकडे 18 लाख वापरकर्ते आहेत, त्यापैकी 18 हजार दररोज सक्रिय वापरकर्ते आहेत, असे आर्यन यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही वेगवेगळ्या इंधन विक्रेत्या कंपनीशी करार केला आहे. आम्ही त्यांना डेटादेखील देतो आणि त्यांच्या प्री-इंस्टॉल कॅमेऱ्यात आम्ही आमची ऑटोमॅटिक इंटेलिजेंस चिप बसवतो जी आम्हाला सर्व माहिती देते, असेही ते म्हणाले.

67 लाखांचा निधी मिळाला -

तर आलाप सांगतात की, आता आम्हाला शार्क टँककडून 67 लाखांचा निधीही मिळाला आहे, ज्यातून आम्ही काम करणार आहोत. आम्ही इंधन विकणाऱ्या कंपनीकडून काही सब्सक्रिप्शन घेतो, असेही ते म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Business, Delhi, Digital services, Money