जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टाटा मोटर्सचं CNG कारच्या दुनियेत मोठं पाऊल; Tiago iCNG आणि Tigor iCNG झाल्या लॉन्च, वाचा सर्व फिचर

टाटा मोटर्सचं CNG कारच्या दुनियेत मोठं पाऊल; Tiago iCNG आणि Tigor iCNG झाल्या लॉन्च, वाचा सर्व फिचर

टाटा मोटर्सचं CNG कारच्या दुनियेत मोठं पाऊल; Tiago iCNG आणि Tigor iCNG झाल्या लॉन्च, वाचा सर्व फिचर

कंपनीने आधीच Tiago iCNG आणि Tigor iCNG साठी बुकिंग सुरु केले आहे. पाच हजार 500 रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतची टोकन रक्कम भरून तुम्ही या गाड्या बुक करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जानेवारी : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने अखेर सीएनजी कारच्या जगात पाऊल टाकले आहे. कंपनीने बुधवारी अधिकृतपणे आपल्या लोकप्रिय हॅचबॅच कार Tiago आणि sedan कार Tigor - Tiago iCNG आणि Tigor iCNG चे CNG प्रकार भारतात लॉन्च केले. या दोन्ही कार आय CNG तंत्रज्ञानाने सादर करण्यात आल्या आहेत. ह्युंदाई आणि मारुतीच्या गाड्यांशी स्पर्धा यासह टाटा मोटर्सने भारतातील फॅक्टरी-फिट सीएनजी पॅसेंजर कारच्या लीगमध्ये प्रवेश केला आहे. टाटाच्या या गाड्या भारतातील ह्युंदाई आणि मारुतीच्या कारशी टक्कर देतील. Tiago iCNG ची एक्स-शोरूम किंमत रु.6,09,900 आहे, तर Tigor iCNG ची किंमत रु.7,69,900 आहे. या गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे कंपनीने आधीच Tiago iCNG आणि Tigor iCNG साठी बुकिंग सुरु केले आहे. पाच हजार 500 रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतची टोकन रक्कम भरून तुम्ही या गाड्या बुक करू शकता. कारमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे इंजिन कंपनीचा दावा आहे की, या कार बेस्ट इन क्लास पावर आहेत. टाटा मोटर्सने या गाड्या 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिनसह डेव्हलप केल्या आहेत. हे इंजिन 73PS ची कमाल पॉवर जनरेट करते. Tigao iCNG चे ग्राउंड क्लीयरन्स 168mm आणि Tigor iCNG चे 165mm आहे. हे वाचा -  Tata Tiago च्या CNG मॉडेलचं बुकिंग सुरू, 5 हजार रुपयांत करता येणार बुक; पाहा किंमत आणि फीचर्स अनेक रंगांमध्ये उपलब्ध

News18

Tata Tiago iCNG मिडनाईट प्लम, अॅरिझोना ब्लू, ओपल व्हाइट, फ्लेम रेड आणि डे टोना ग्रे कलरमध्ये तर Tigor iCNG मॅग्नेटिक रेड, अॅरिझोना ब्लू, ओपल व्हाइट, डे टोना ग्रे आणि डीप रेड रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. हे वाचा -  देशातील सर्वात स्वस्त CNG Car, बाइक इतकं मिळेल मायलेज; पाहा किंमत आणि फीचर्स टाटा मोटर्स आजपासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणार

News18

महत्त्वाची बाब म्हणजे, टाटा मोटर्सने मंगळवारी सांगितले की, 19 जानेवारीपासून ते त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत सरासरी 0.9 टक्क्यांनी वाढ करणार आहेत, ज्यामुळे उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई होईल. मुंबईतील वाहन निर्माता कंपनी देशांतर्गत बाजारपेठेत टियागो, पंच आणि हॅरियर सारख्या विविध मॉडेल्सची विक्री करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car
  • First Published :
जाहिरात
जाहिरात