Home /News /auto-and-tech /

Renault Triber: 'या' 7 सीटर कारवर मिळतीये तब्बल 60 हजारांची सूट, उत्कृष्ट मायलेज अन् किंमतही परवडणारी

Renault Triber: 'या' 7 सीटर कारवर मिळतीये तब्बल 60 हजारांची सूट, उत्कृष्ट मायलेज अन् किंमतही परवडणारी

Renault Triber: 'या' 7 सीटर कारवर मिळतीये तब्बल 60 हजारांची सूट, उत्कृष्ट मायलेज अन् किंमतही परवडणारी

Renault Triber: 'या' 7 सीटर कारवर मिळतीये तब्बल 60 हजारांची सूट, उत्कृष्ट मायलेज अन् किंमतही परवडणारी

Renault Triber Discount Offer: रेनो या महिन्यात आपल्या सर्वात जास्त मागणी असलेल्या MPV Triber वर उत्तम ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनंतर तुम्ही ही कार आणखी स्वस्तात खरेदी करू शकाल.

    मुंबई, 06 ऑगस्ट: सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी रेनो (Renault) या महिन्यात आपल्या सर्वात जास्त मागणी असलेल्या MPV Triber वर उत्तम ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनंतर तुम्ही ही कार आणखी स्वस्तात खरेदी करू शकाल. ही देशातील एक अशी 7 सीटर कार आहे, जिची किंमत अनेक 5 सीटर कारपेक्षा कमी आहे. तिचं मायलेजही चांगलं आहे. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनंही ती खूप चांगली आहे. एवढंच नाही तर 7 प्रवासी बसल्यानंतरही लहान मुलांना बसता येईल एवढी जागा तिच्यात आहे. तसेच, सामान ठेवण्यासाठीही पुरेशी जागा आहे. कंपनीने 1 लाखांहून अधिक ट्रायबर्सची विक्री केली आहे. चला जाणून घेऊया ट्रायबरची फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि त्यावर उपलब्ध ऑफर्स. Renault Triber वर 60,000 ची सूट- Renault तिच्या सब फोर-मीटर MPV ट्रायबरवर 60,000 रुपयांची सूट देत आहे. मात्र, ही ऑफर महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि गुजरातसाठी आहे. स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत 45,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि 10,000 रुपयांचे इतर फायदे असतील. त्याच वेळी, इतर राज्यांमध्ये, कंपनी यावर 55,000 रुपयांपर्यंत लाभ देत आहे. ही ऑफर Renault Triber च्या लिमिटेड एडिशनवर उपलब्ध नसेल. ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे. रेनो ट्राइबरचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
    • रेनॉल्ट ट्रायबरचं लिमिटेड एडिशनदेखील तुम्ही खरेदी करू शकता. ही कार ड्युअल-टोन कलर मूनलाइट सिल्व्हर आणि कॉन्ट्रास्ट ब्लॅक रूफमध्ये सीडर ब्राउनमध्ये उपलब्ध असेल. या कारला स्टायलिश नवीन 14-इंच फ्लेक्स व्हील्स दिली गेली आहेत. यात पियानो ब्लॅक फिनिशसह ड्युअल-टोन डॅशबोर्ड आहे.
    • यात नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोल्स्ट्री देखील मिळते. संपूर्ण डिजिटल व्हाईट एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रोम रिंगसह HVAC नॉब्स आणि आतील दरवाजाचे काळे हँडल यामुळं ही कार अधिक स्टायलिश बनते.
    • कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यामध्ये माउंटेड कंट्रोल्ससह स्टीयरिंग, स्टार्ट/स्टॉप पुश-बटण, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, सिक्स-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि बरेच काही समाविष्ट आहे.
    • कारचा व्हीलबेस 2,636mm आणि ग्राउंड क्लियरन्स 182mm आहे. लोकांना त्यात अधिक जागा मिळावी, अशा पद्धतीनं तिची रचना करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे, की ट्रायबरची सीट 100 पेक्षा जास्त प्रकारे एडजस्ट केली जाऊ शकते.
    हेही वाचागुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा रेनो ट्रायबरचं इंजिन- रेनो ट्रायबरमध्ये 1.0-लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे पेट्रोल इंजिन 71 एचपीची कमाल पॉवर आणि 96 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटीशी जोडलेले आहे. ही कार 18 ते 19 kmpl मायलेज देते. रेनो ट्रायबर RXE, RXL, RXT, लिमिटेड एडिशन, RXT Easy-R, RXZ, RXZ DualTone, Limited Edition Easy-R, RXZ Easy-R, RXZ Easy-R Dualtone या 10 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ग्लोबल NCAP कडून 4 स्टार रेटिंग प्राप्त- ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट रेटिंगमध्ये या कारला प्रौढांसाठी 4 स्टार आणि लहान मुलांसाठी 3 स्टार रेटिंग मिळालं आहे. सुरक्षेसाठी यात ड्रायव्हर, प्रवासी यांच्यासह साइड एअरबॅगचा समावेश आहे. ड्रायव्हरच्या सीटवर लोड लिमिटर आणि प्रीटेन्शनर देखील आहे. तिचं इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT शी जोडलेले आहे. या कारसोबत स्मार्ट कार्डची एक्सेसही उपलब्ध आहे.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Car, Discount offer

    पुढील बातम्या