मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

खोडदच्या महाकाय दुर्बिणीची कमाल, पृथ्वीपासून 10 हजार किमी लावला नवा शोध

खोडदच्या महाकाय दुर्बिणीची कमाल, पृथ्वीपासून 10 हजार किमी लावला नवा शोध

यासंबधीचे छायाचित्र 'एबेल:2256' या आकाशगंगासमूहातील आकाशगंगांच्या टकरी तसेच विलीनीकरण दर्शवितात.

यासंबधीचे छायाचित्र 'एबेल:2256' या आकाशगंगासमूहातील आकाशगंगांच्या टकरी तसेच विलीनीकरण दर्शवितात.

यासंबधीचे छायाचित्र 'एबेल:2256' या आकाशगंगासमूहातील आकाशगंगांच्या टकरी तसेच विलीनीकरण दर्शवितात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Junnar, India
  • Published by:  Khushalkant Dusane

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

जुन्नर, 22 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील खोडद येथील मीटर तरंगलांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीला ‘एबेल:2256’ आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणे टिपण्यात यश मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे हे यश मिळाल्याचे मानले जाते. पृथ्वीपासून दहा हजार प्रकाशवर्षांपेक्षाही दूर असलेला 'एबेल:2256' आकाशगंगा समूह आहे.

याप्रमाणे आपली पृथ्वी एका सौरमालेत आहे आणि सौरमाला आकाशगंगेत (मिल्कीवे - मंदाकिनी) आहे. तशाच लाखो आकाशगंगा विश्वामध्ये आहेत. तर हजारो लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगाही समूह स्वरुपात (ग्यालेक्टिक क्लस्टर) आहेत. शेकडो ते हजारो आकाशगंगांचे गुरुत्वाकर्षणाने एकत्रित असलेले समूह विश्वातील प्रचंड अशी रचना मानली जाते. असाच पृथ्वीपासून 10 हजार प्रकाशवर्षांपेक्षाही दूर असलेला 'एबेल:2256' आकाशगंगा समूह त्याच्या जटील संरचनेमुळे ओळखला जातो.

या क्लस्टरचे तापमान 10 लाख सेंटीग्रेडपोक्षाही जास्त असल्याचे तसेच 'प्लाझ्मा' म्हणजे पदार्थाच्या चौथ्या अवस्थेतील युक्त अशा वायूंनी भरलेले दिसले आहे. या आकाशगंगा समूहात होत असलेल्या आकाशगंगांच्या टकरी किंवा विलीनीकरणामुळे प्रचंड ऊर्जा मुक्त होते म्हणजे उत्सर्जित होत असते. या ऊर्जेचे उत्सर्जन विद्युत चुंबकीय वर्णपटातील क्ष किरणांपासून रेडिओ लहरीं मधील प्रारणाद्वारे होते.

हे रेडिओ लहरींचे प्रारण संबंधित दुर्बिणीतून अभ्यासल्यास या आकाशगंगा तसेच त्यांच्या समूहाचे आकारविज्ञान कळण्यास मदत होते. खोडद स्थित (जि. पुणे) येथील मीटर तरंगलांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीला ‘ एबेल:2256’ आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणे टिपण्यात यश मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे हे यश मिळाल्याचे मानले जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोलभौतिक शास्त्रज्ञांच्या संघाने या संदर्भात निरीक्षणे केली होती. ज्याचे नेतृत्व इटलीमधील बोलोग्ना विद्यापीठातील कार्यरत रेडिओ खगोलशास्त्रज्ञ कमलेश राजपुरोहित यांनी केले आहे. या शास्त्रज्ञांनी आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणांची निरीक्षणे करण्यासाठी जीएमआरटीसहीत नेदरलँड्समधील 'लो फ्रिक्वेन्सी ऍरे', अमेरिकेतील ‘ कार्ल जान्स्की व्हेरी लार्ज ऍरे' या रेडिओ दुर्बिणींबरोबरच ‘एक्सरे मल्टीमिरर न्युटन’ आणि ‘चंद्रा’ या क्ष किरणांद्वारे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणींचीही मदत घेतली होती. मात्र, जीएमआरटीच्या अधिक संवेदनशीलतेमुळे अद्याप ज्ञात नसलेल्या आकाशगंगांच्या प्रतिमा टिपता आल्या.

या नाविन्यपूर्ण संशोधनाबद्दल बोलताना राजपुरोहित म्हणाले की, "जीएमआरटीद्वारे निरीक्षण केल्यानंतर ' एबेल:2256' या आकाशगंगासमूहातील आकाशगंगांच्या टकरी किंवा विलीनीकरणाबद्दल अधिक सखोल माहिती मिळू लागली आहे. अन्य दुर्बिणींपेक्षा नवीन निष्कर्ष 'एबेल:2256' च्या आकारविज्ञानबद्दल अधिक आगळीवेगळी माहिती देणारे आहेत. तसेच अजूनही माहितीचे (विदा) विश्लेषण होत असल्यामुळे या आकाशगंगासमूहाची आणखी वैशिष्ट्ये समजण्यास वाव आहे. ‘एबेल:2256’ बाबत भूतकाळात झालेल्या भौतिकीय घडामोडी समजतील," असेही त्यांनी सांगितले.

या नाविन्यपूर्ण संशोधनाबद्दल बोलताना जीएमआरटीचे संचालक प्रमुख डॉ. यशवंत गुप्ता यांनी सांगितले की, "अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे ‘एबेल:2256’ प्रमाणेच आणखी नवनवीन आकाशगंगासमूहांचे वेध घेता येतील. जीएमआरटीमुळे निम्न वर्णपटातील रेडिओ लहरींद्वारे खगोलीय निरीक्षणांसाठी ही खास सुविधा निर्माण झाली आहे," असेही त्यांनी सांगितले.

जीएमआरटी टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या छ्त्राखालील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र संचलित आंतरराष्ट्रीय रेडिओ दुर्बीण प्रणाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोलभौतिक शास्त्रज्ञांच्या संघात ई. ओसिंगा, आर. जे. व्हॅन वीरेन (लायडन वेधशाळा-नेदरलँड्स), एफ. वाझा, एम. ब्रिएन्झा, जी. ब्रुनेटी, ब्रॉटियान, बॉनफेड, रिस्ले, डी. डल्लाकासा, मिले, रॉसेटी, कॅझ्यानो (बोलोग्ना विद्यापीठ-इटली), फॉरमन (स्मिथॉनसीएन खगोलभौतिकी केंद्र-हावर्ड ) ए. द्राबेंट, बॉनासीएक्स (युरिंगर वेधशाळा-जर्मनी), एस. राजपुरोहित (लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळा- बर्कले) तसेच ए. एस. राजपुरोहित (भौतिकीय संशोधन प्रयोगशाळा-अहमदाबाद); या विविध संशोधन संस्थांमधील वैज्ञानिकांचा समावेश आहे. यासंबधीचे छायाचित्र 'एबेल:2256' या आकाशगंगासमूहातील आकाशगंगांच्या टकरी तसेच विलीनीकरण दर्शवितात.

First published:

Tags: Science, Technology, Top news india