Home /News /auto-and-tech /

लॉंचिंगच्या एक आठवडापूर्वीच Redmi Note 11ची किंमत आणि फीचर लीक, लवकर पाहा

लॉंचिंगच्या एक आठवडापूर्वीच Redmi Note 11ची किंमत आणि फीचर लीक, लवकर पाहा

मात्र हे फोन लॉंच होण्याच्या एक आठवड्यापूर्वी या फोनची किंमत आणि फीचर्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : रेडमीच्या (Redmi) चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. रेडमी नोट 11, रेडमी नोट 11 प्रो आणि रेडमी नोट 11 प्रो प्लस हे स्मार्टफोन्स पुढील आठवड्यात लॉंच होत आहेत, हे तुम्ही जाणताच; मात्र हे फोन लॉंच होण्याच्या एक आठवड्यापूर्वी या फोनची किंमत आणि फीचर्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. या फोनमध्ये 120 Hz चा डिस्प्ले आणि 5000 mAhची बॅटरी असेल असं या माहितीवरून दिसून येत आहे. या सर्व स्मार्टफोन्समध्ये Mediatek Dimensity Range Of SoCs हा प्रोसेसर (Processor) असेल. तसंच या सर्व फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीचा पर्याय उपलब्ध असेल. या फोनमध्ये कमाल स्टोरेज 256GB असेल अशी माहितीही समोर आली आहे. या फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन असेल. तसंच यांची बॉडी मिडल फ्रेम अॅल्युमिनियम अॅलॉयपासून तयार केलेली असावी. या फोनबाबतची सर्व माहिती एका चिनी टिप्स्टरने उघड केली आहे. या दिवशी लॉंच होणार हे स्मार्टफोन रेडमी नोट 11 (Redmi Note 11) अधिकृतरीत्या 28 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी लॉंच होत आहे. कंपनी या सोहळ्यात तीन नवे स्मार्टफोन लॉंच करणार असून, त्यात रेडमी नोट 11, रेडमी नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro) आणि रेडमी नोट 11 प्रो प्लसचा (Redmi Note 11 Pro Plus) समावेश आहे. हे ही वाचा-Realme कंपनीच्या या हँडसेटवर बंपर डिस्काऊंट; फोनची किंमत अवघे... टिप्स्टरच्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाला, तर रेडमी नोट 11 ची किंमत 1199 चिनी युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 14000 रुपये असू शकते. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळू शकतं. याशिवाय फोनचे 6GB+128 GB, 8GB+128 GB आणि 8GB+256 GB हे मॉडेल्ससुद्धा येऊ शकतात. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 1399 युआन म्हणजेच 16,400 रुपये, 1599 युआन म्हणजेच 18,700 रुपये आणि 1799 युआन म्हणजेच सुमारे 21 हजार रुपये असू शकते. नोट 11 प्रो आणि नोट 11 प्रो प्लसची किंमत असेल अशी रेडमी नोट 11 प्रोची प्रारंभिक किंमत 1599 युआन म्हणजेच 18,700 रुपयांदरम्यान असू शकते. ही किंमत या फोनच्या 6GB+128 GB या बेस व्हॅरिएंटची (Variant) असेल. प्रो प्लसमध्ये 8GB+128GB व्हॅरिएंटची किंमत सुमारे 21 हजार रुपये तर 8GB+256GB व्हॅरिएंटची किंमत सुमारे 23,400 रुपये असू शकते.
    First published:

    Tags: Redmi, Social media

    पुढील बातम्या