जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / भारतातील लोकप्रिय ‘अल्टो’ आता येणार नव्या रुपात; इंजिनपासून डिझाईनपर्यंत सर्व बदललं

भारतातील लोकप्रिय ‘अल्टो’ आता येणार नव्या रुपात; इंजिनपासून डिझाईनपर्यंत सर्व बदललं

भारतातील लोकप्रिय ‘अल्टो’ आता येणार नव्या रुपात; इंजिनपासून डिझाईनपर्यंत सर्व बदललं

रिपोर्ट्समधून असं समोर आलं आहे, की ऑगस्ट 2022 मध्येच ही गाडी लाँच होऊ शकते. कंपनीने याबाबत टेस्टिंग (New Alto testing) सुरू केलं आहे

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 22 जुलै : मारुती सुझुकीने 2000 साली लाँच केलेली अल्टो (Maruti Alto) ही कार काही वर्षांमध्येच देशभरात लोकप्रिय झाली होती. कंपनीने 20 वर्षांमध्ये या मॉडेलच्या तब्बल 40 लाखांहून अधिक गाड्या विकल्या आहेत. यातूनच याच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. कमी किंमत, कॉम्पॅक्ट डिझाईन आणि चांगला परफॉर्मन्स अशा सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन असलेली अल्टो आता नव्या रुपात (New Alto) सादर होणार आहे. रिपोर्ट्समधून असं समोर आलं आहे, की ऑगस्ट 2022 मध्येच ही गाडी लाँच होऊ शकते. कंपनीने याबाबत टेस्टिंग (New Alto testing) सुरू केलं आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डिझाइनमध्ये मोठे बदल मारूती सुझुकीने नव्या अल्टो नेक्स्ट जनरेशन मॉडेलची (Maruti Suzuki Alto) चाचणी सुरू केली आहे. यादरम्यानचे काही फोटो लीक (Next Generation Alto leaked photos) झाल्यामुळे या कारची झलक सर्वांसमोर आली आहे. अल्टोच्या डिझाइनमध्ये (Alto Next gen design) बरेच बदल केल्याचे यातून दिसून येत आहे. जुन्या अल्टोपेक्षा आकर्षक असं हे डिझाइन असल्याचंही म्हटलं जात आहे. या सेगमेंटमध्ये सध्या येत असलेल्या इतर गाड्यांना टक्कर देण्यासाठी हे डिझाईन तयार करण्यात आलं आहे. नव्या अल्टोला मॉड्युलर हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर (Modular Heartect Platform) तयार केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच नवीन पॉवरट्रेनदेखील देण्यात येणार आहे. Car Maintenance Tips: घरच्या घरी चेक करू शकता कारचे ब्रेक पॅड, करावं लागेल ‘हे’ काम विविध इंजिनचे पर्याय अल्टो कारच्या दोन वेगवेगळ्या एडिशन यापूर्वीही लाँच करण्यात आल्या आहेत. आता येणारं मॉडेल हे थर्ड जनरेशन (Alto Third generation) असणार आहे. यामध्ये K10C 1.0 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकतं. हे इंजिन 89 एनएमचा पीक टॉर्क आणि 67 एचपी पॉवर जनरेट करतं. नवीन अल्टो ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनच्या पर्यायांसोबत लाँच (New Alto engine options) होऊ शकते असंही म्हटलं जात आहे. यासोबतच सीएनजी व्हेरियंटचा पर्यायही कंपनी देऊ शकते, असं म्हटलं जात आहे. नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता अल्टोच्या थर्ड जनरेशन मॉडेलमध्ये हेडलँप आणि फॉग लँप या दोन्हीच्या डिझाईनमध्ये बदल दिसू शकतात. याशिवाय मेश ग्रिलच्या फ्रंट बंपरमध्येही बदल केले जाऊ शकतात (New Alto features) असं सांगण्यात येत आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये ही गाडी भरपूर लोकप्रिय ठरली असली, तरीही मार्केटमध्ये इतर चांगले पर्याय उपलब्ध झाल्यामुळे अल्टोची लोकप्रियता कमी होत होती. यावर मात करण्यासाठी आता कंपनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. अल्टोच्या या थर्ड जनरेशन मॉडेल हे ग्राहकांना नक्कीच आपल्याकडे आकर्षित करून घेईल असा विश्वास मारूती सुझुकीने व्यक्त केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात