विशाल झा, प्रतिनिधी
गाजियाबाद, 10 मार्च: उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हाचा त्रास सुरू झाला आहे. आभाळातून बरसणाऱ्या या आगीपासून बचाव करण्यासाठी लोक आता एसी, कुलर खरेदीकडे वळू लागले आहेत. या उन्हाळ्यात तुम्हाला थंड हवा देण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका कूलरबद्दल सांगत आहोत जो तुम्हाला थंड हवा तर देईलच पण यामाध्यमातून तुम्हाला तुमची आवडती गाणीही ऐकायला मिळतील.
गाझियाबाद आणि नोएडाच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट व्यापाऱ्यांच्या डीलर मीटच्या निमित्ताने अनेक उत्पादने लाँच करण्यात आली. यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता, संगीतासह असलेला कूलर. हा भारतातील पहिला म्युझिक कूलर असल्याचे उद्योगपती संदीप गर्ग सांगतात. हे तरुण आणि वृद्ध दोघांसाठी सोयीचे आहे.
या कुलरमध्ये आकर्षक दिवेही लावण्यात आले आहेत. कुणाला पार्टी करायची असेल, तर त्यासाठीही हा कुलर उपयोगी पडेल. कारण डीजे लाइट आणि म्युझिकसोबत काम करेल. या कुलरची 2 वर्षांची वॉरंटी आहे. ज्याची किंमत 8 हजार रुपयांपासून सुरू होऊन 12 हजार रुपयांपर्यंत आहे.
स्वस्तात मस्त! कमी किमतीत घरी आणा हा AC, उन्हाळा जाईल सुखात, वीज बिलही येईल कमी
उत्पादने 30 टक्के अधिक महाग मिळतील -
व्यापारी संदीप गर्ग म्हणाले की, या हंगामात भरपूर प्री-बुकिंग झाले आहे. यासोबतच आगामी काळात ग्राहकांना उत्पादन घेण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कच्चा माल, उत्पादन खर्च आणि कामगार खर्चात वाढ झाली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ग्राहकांना 30 टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
घर स्वच्छ करणारा रोबोटही लाँच -
या कार्यक्रमात रोबोट व्हॅक्यूम क्लिनरचेही लोकार्पण करण्यात आले. या रोबोटमध्ये वेगवान काम करणारे ब्लेड, बॅटरी इ. रोबोट जमिनीवरचे जुने डाग सहज साफ करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Rise in temperatures, Technology, Uttar pradesh