मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /मॉडेल आपल्या फोटो-व्हिडिओसह विकणार आयफोन; खरेदी करण्यासाठी चाहत्याने लावली साडेआठ लाखांची बोली

मॉडेल आपल्या फोटो-व्हिडिओसह विकणार आयफोन; खरेदी करण्यासाठी चाहत्याने लावली साडेआठ लाखांची बोली

या मॉडेलने तिचा आयफोन 12 प्रो मॅक्स हा फोन विकणार असल्याचं जाहीर केलं आहे.

या मॉडेलने तिचा आयफोन 12 प्रो मॅक्स हा फोन विकणार असल्याचं जाहीर केलं आहे.

या मॉडेलने तिचा आयफोन 12 प्रो मॅक्स हा फोन विकणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • | thailand

    जगभरात अ‍ॅपलच्या आयफोनचा मोठा चाहता वर्ग आहे. अ‍ॅपल कंपनीदेखील युझर्ससाठी वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेले आयफोन्स लॉंच करत असते. सध्या आयफोन 14 सीरिज जोरदार चर्चेत आहे. अ‍ॅपल कंपनीने नुकतीच ही सीरिज लॉंच केली आहे. आयफोनप्रेमींमध्ये या सीरिजची जोरदार चर्चा आहे. आयफोन 14 सीरिजला जगभरातल्या युझर्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

    यादरम्यान थायलंडमधली एक मॉडेल जोरदार चर्चेत आली आहे. ही मॉडेल तिचा फोन विकणार असून, यासोबत ती तिचे सुंदर फोटोज आणि व्हिडिओजचं कलेक्शनदेखील विकणार आहे. या संदर्भात तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. फोन आणि फोटोज-व्हिडिओजचं कलेक्शन विकण्यामागे तिचा एक खास उद्देश आहे. तिचा हा उद्देश समजल्यावर नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    थायलंडमधली 26 वर्षांची कनोक्यदा का-नान जीतमपोन या नावाची मॉडेल सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आहे. कनोक्यदा सोशल मीडियावर खूप पॉप्युलर आहे. तिला फेसबुक पेजवर 16,96,405 फॉलोअर्स आहेत. तसंच इन्स्टाग्रामवर कनोक्यदाला सुमारे 5 लाख जण फॉलो करतात.

    या मॉडेलने तिचा आयफोन 12 प्रो मॅक्स हा फोन विकणार असल्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे या आयफोनसोबत फोनमधले तिचे सुंदर फोटोज आणि व्हिडिओजचं कलेक्शनदेखील खरेदी करणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे. ही ऑफर समजताच या मॉडेलच्या एका चाहत्यानं आठ लाख 60 हजार रुपये देऊन हा आयफोन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे; मात्र कनोक्यदानं फोनची विक्री नेमकी कोणाला करायची याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

    कनोक्यदानं तिच्या चाहत्यांना सांगितलं, `मी माझा जुना आयफोन विकून नवा आयफोन 14 प्रो मॅक्स 128GB खरेदी करू इच्छिते.` तिनं आयफोन 12 प्रो मॅक्सचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यात तिनं लिहिलं आहे, की `आयफोन 14 खरेदी करण्यासाठी मी माझ्याकडचा आयफोन 12 विकत आहे. फोनसोबत फोनमधले माझे सर्व फोटो आणि व्हिडिओजदेखील खरेदी करणाऱ्या व्यक्तीला मिळतील.`

    कनोक्यदाची ही फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली. ही पोस्ट सुमारे 70 हजार जणांनी लाइक केली, तर दोन हजार जणांनी शेअर केली. या पोस्टवर सुमारे तीन हजार कमेंट्सही आहेत. `मी माझ्या फोनमधला कोणताही फोटो किंवा व्हिडिओ डिलीट करणार नाही,` असं कनोक्यदाने स्पष्ट केलं आहे. तिच्या फोनमध्ये सुमारे 30 हजार फोटोज आणि चार हजार व्हिडिओज आहेत. अनेक चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करून फोनची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही युझर्सनी कनोक्यदाला फोनचा लिलाव करण्याचाही सल्ला दिला आहे.

    `ही पोस्ट शेअर केल्यानंतर सुमारे तीन हजार जणांनी मेसेज करून मला फोनची किंमत विचारली आहे,` असं कनोक्यदाने सांगितलं. एका चाहत्याने कनोक्यदाला फोनसाठी 8 लाख 60 हजार रुपयांची ऑफर दिली आहे. तिने ही ऑफर स्वीकारली तर ती या किमतीत थायलंडमध्ये 20 नवे आयफोन्स खरेदी करू शकते.

    First published:

    Tags: Apple, Iphone, Smartphones