मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

थारप्रेमींना मोठा झटका; महिंद्रा कंपनीने `हे` फीचर काढून टाकण्याचा घेतला निर्णय

थारप्रेमींना मोठा झटका; महिंद्रा कंपनीने `हे` फीचर काढून टाकण्याचा घेतला निर्णय

महिंद्रा थार

महिंद्रा थार

थारमधील ऑटो डिफरन्शियल लॉक हे फीचर सर्व व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून देण्यात आलं होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : दुर्गम, डोंगराळ भागात ड्रायव्हिंग करण्याची आवड असणाऱ्यांसाठी महिंद्रा कंपनीची थार ही गाडी उत्तम पर्याय मानली जाते. त्यामुळे देशभरात थारप्रेमींची संख्या लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांत थारने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र आता महिंद्रा थारप्रेमींसाठी एक महत्त्वाची आणि वाईट बातमी आहे. महिंद्रा कंपनीने थारमध्ये मोठा बदल केला आहे.

कंपनीने पुन्हा एकदा थार अपग्रेड केली असून, कंपनीने थारच्या एका व्हेरियंटव्यतिरिक्त अन्य सर्व व्हेरियंटमधून ऑफ रोडिंगवेळी उपयुक्त ठरणारं एक मोठं फीचर काढून टाकलं आहे. यासह थार खरेदी करून ऑफरोडिंगची आवड असलेल्या लोकांसाठी ही वाईट बातमी ठरू शकते. अपडेट दरम्यान इंजिनची क्षमता आणि पॉवर लक्षात घेत कंपनीने हे फीचर काढून टाकल्याचे सांगितले जात आहे. यामुळे थारप्रेमींना मोठा झटका बसू शकतो. हे फीचर काढून टाकल्याने दुर्गम भागात ड्रायव्हिंग करताना काहीशा अडचणी भासू शकतात असं बोललं जात आहे.

किंबहुना, थारमधील ऑटो डिफरन्शियल लॉक हे फीचर सर्व व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड फीचर म्हणून देण्यात आलं होतं. पण आता हे फीचर फक्त टॉप एंड व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. हे फीचर काढून टाकण्यामागे कॉस्ट कटिंग हेही एक मोठं कारण असू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. दुसरीकडे, हे फीचर काढून टाकल्याने थारच्या ऑफ रोड क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, असं ऑफ रोडिंग तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे फीचर काढून टाकल्याने चिखल, वाळू, बर्फाळ मार्ग आणि पाणी ओलांडताना वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. विशेषतः दुर्गम भागात ड्रायव्हिंग करताना समस्या निर्माण होऊ शकतात. हे फीचर काढून टाकण्याचा निर्णय कंपनीनं घेतल्यानं ग्राहकांना काहीसा धक्का बसला असून ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा - प्रतीक्षा संपली! Tataच्या नव्या CNG कारची दमदार एंट्री, Swift अन् i10ला फोडणार घाम

डिफरन्शियल लॉक म्हणजे काय?

ऑफ रोडिंगदरम्यान डिफरन्शियल लॉक हे अतिशय उपयुक्त फीचर आहे. हे फीचर चाकांमध्ये पावर ट्रान्सफर मॅनेजमेंटचं काम करतं. उदाहरणार्थ, तुमच्या थारचे दोन टायर वाळूमध्ये रुतले असतील तर ऑटो डिफरन्शियल लॉक तुमच्या गाडीच्या त्या दोन टायर्सना जास्त पॉवर देऊन बाहेर पडण्यास मदत करेल. गुरखा मॉडेलमध्येदेखील डिफरन्शियल लॉक फीचर येतं. त्यात डिफरन्शियल लॉकचा मॅन्युअल ऑप्शन उपलब्ध असतो. बहुतांश चारचाकी गाड्यांमध्ये आता डिफरन्शियल लॉक फीचर ऑटो मोडमध्ये उपलब्ध असतं.

First published:

Tags: Anand mahindra, Car, Tech Mahindra, Technology