जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Mahindra Thar 5-door : अखेर प्रतिक्षा संपली; 'या' दिवशी लाँच होणार महिंद्रा थार 5-डोअर

Mahindra Thar 5-door : अखेर प्रतिक्षा संपली; 'या' दिवशी लाँच होणार महिंद्रा थार 5-डोअर

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

थारच्या चाहत्यांसाठी कंपनीनं एक मोठी घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनी येत्या 15 ऑगस्टला ‘थार 5-डोअर’ एसयूव्ही सादर करणार आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 जून : कोणत्याही प्रदेशात आणि कोणत्याही हवामानात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या गाड्या तयार करण्यासाठी महिंद्रा कंपनी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनीची ‘थार’ ही गाडी मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेषत: तरुणाईमध्ये या गाडीची जास्त क्रेझ आहे. थारच्या चाहत्यांसाठी कंपनीनं एक मोठी घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनी येत्या 15 ऑगस्टला ‘थार 5-डोअर’ एसयूव्ही सादर करणार आहे. ऑटोकार इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, 15 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कार्यक्रमात थार 5-डोअर पहिल्यांदाच ग्राहकांना बघायला मिळणार आहे. ‘डीएनए’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महिंद्रानं गेल्या काही वर्षांपासून 15 ऑगस्ट रोजी आपली विविध प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत. हिंदुस्थान लाईव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, 15 ऑगस्ट 2020 रोजी नवीन थारनं आपला ग्लोबल डेब्यु केला होता. यानंतर 15 ऑगस्ट 2021 रोजी XUV700 चा वर्ल्ड प्रीमिअर झाला आणि गेल्या वर्षी त्याच्या ईव्ही मॉडेलचे यूकेमध्ये अनावरण करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेतील मार्केटमध्ये महिंद्राच्या वाहनांना मागणी वाढत आहे. तिथे सध्या महिंद्रा XUV300, महिंद्रा XUV700 आणि नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एन या गाड्यांची चांगली विक्री होत आहे. त्यामुळे थार 5-डोअर पहिल्यांदा तिथेच लाँच करण्याचा निर्णय घेतला गेला असावा, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतात सणासुदीच्या काळात ‘थार 5-डोअर’चं बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे आणि पुढील वर्षी डिलिव्हरी सुरू होईल. महिंद्रा थार 5-डोअर हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत थार 3-डोअरपेक्षा अधिक जास्त यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा आहे. कारण, या गाडीची प्रॅक्टिकॅलिटी, स्पेस आणि आकारामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सध्या भारतामध्ये 5-डोअर सेक्शनमध्ये ‘मारुती सुझुकी जिमनी’ ही गाडी लोकप्रिय आहे. महिंद्रा थार 5-डोअरमध्ये 2.2-लिटर डिझेल आणि 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन्स असतील. गाडीचा बॉक्सी आकार आणि उंची आहे तशीच ठेवण्यात आली आहे. गाडीचा पुढचा आणि रीड-एंड सध्याच्या थारसारखाच आहे. पण, अधिक प्रशस्त केबिन देण्यासाठी नवीन थारमध्ये मागील दरवाजे मोठे आणि व्हीलबेस ताणण्यात आलेले आहेत. या नवीन गाडीत नवीन अलॉय व्हील्सदेखील असतील, असं म्हटलं जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात