मुंबई, 13 सप्टेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारी महाराष्ट्र राज्य सरकारची इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी (EV Policy) अखेर राज्यभरात लागू (Goes live) झाली आहे. यामुळे राज्यात ई-व्हेईकल्स (E Vehicles) खरेदी करणं आणखी स्वस्त होणार असून ग्राहकांना याचा थेट फायदा मिळणार आहे. या पॉलिसीची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कधी होते, याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. मात्र अखेर ही प्रतीक्षा संपली असून या पॉलिसीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
काय आहे पॉलिसी?
महाराष्ट्रात एखाद्या नागरिकाने जर ई-व्हेईकल खरेदी केलं, तर त्याला नव्या धोरणानुसार भरघोस सवलत मिळणार आहे. यासाठी ई-व्हेईकल्सवर सरकारने सबसिडी आणि भरघोस इन्सेन्टिव्ह जाहीर केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी ग्राहकांना काहीच धावपळ करण्याची किंवा औपचारिकता पूर्ण करण्याची गरज नसेल. सरकारकडून ही सबसिडी मिळवण्याची जबाबदारी वाहन उत्पादकांवर सोपवण्यात आली आहे.
EV subsidies finally are going live in Maharasthra. Prices of 450+ come down by ~24K and is now priced at 1.03L in the state, lowest in the country today. Honestly, 450+ at a price lower than several 125cc scooters is a bonkers pricing!
— Tarun Mehta (@tarunsmehta) September 13, 2021
अशी असेल रचना
एखाद्या ग्राहकाने जर एखाद्या कंपनीची गाडी खरेदी केली, तर त्या कंपनीला राज्य सरकारकडे सबसिडीसाठी क्लेम करावा लागेल. इनव्हॉईसचे तपशील आणि ऍफिडेव्हिट सबमिट करून आपल्या कंपनीचं वाहन विकलं गेल्याचे पुरावे राज्य सरकारला कंपन्या सादर करतील. दर 15 दिवसांनी कंपन्या सरकारकडे सबसिडी क्लेम करू शकणार आहेत. त्यानंतर या क्लेमची खातरजमा करून 90 दिवसांच्या आत कंपन्यांच्या खात्यावर RTGS प्रणालीमार्फत सबसिडीची रक्कम जमा केली जाणार आहे.
हे वाचा -खास महिलांसाठी LIC 'ही' पॉलिसी, जी देते लाखोंचा लाभ
किती मिळणार सवलत?
राज्य सरकारनं पहिल्या 1 लाख ई-व्हेईकल्सवर भरघोस सबसिडीची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2021 पूर्वी वाहन खरेदी केल्यास या वाढीव सवलतीचा लाभ खरेदीदारांना मिळू शकणार आहे. प्रति किलोवॅट बॅटरीसाठी 5000 रुपयांचं अनुदान मिळणार असल्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे. 3KWh बॅटरीच्या दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपयांची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 31 डिसेंबर 2021 ची मुदत सध्या निश्चित करण्यात आली आहे. थोडक्यात 3KWh बॅटरी असणारी दुचारी जर 31 डिसेंबरच्या अगोदर खरेदी केली, तर त्यावर सगळी मिळून 25 हजार रुपयांची सवलत मिळू शकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles, State goverment