Home /News /auto-and-tech /

Vodafone Idea आणि Airtel नंतर Jioचेही Recharge महागले; जाणून घ्या नवे दर

Vodafone Idea आणि Airtel नंतर Jioचेही Recharge महागले; जाणून घ्या नवे दर

गेल्या काही दिवसांपूर्वी Vodafone Idea आणि Airtel च्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

    मुंबई, 28 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपूर्वी Vodafone Idea आणि Airtel च्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता Jio ने देखील आपल्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका सहन करावा लागणार आहे. टेलिकॉम कंपनी Airtel चे रिचार्ज प्लॅन 26 नोव्हेंबरपासून महागले आहेत. Vodafone-Idea चे रिचार्ज वाढल्यानंतर Airtel नेही दरात वाढ केली आहे. नव्या टॅरिफ प्लॅननुसार, Airtel चा सर्वात स्वस्त 79 रुपयांचा प्लॅन आता 99 रुपये झाला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये 200 MB डेटा आणि 1 पैसा प्रति सेकंद कॉलिंगची सुविधा मिळेल. जाणून घ्या Jio चे नवे प्रीपेड प्लान.. आज Jio ने नवे प्लान जाहीर केले आहे. 1 डिसेंबरपासून नवे दर लागू होतील असंही सांगण्यात आलं आहे. आता 75 रुपयांचा प्लान तुम्हाला 91 रुपयांना पडेल. त्याशिवाय 129 रुपयांचा प्लान 155 रुपयांपर्यंत जाईल. Vodafone Idea रिचार्ज प्लॅनही महागले - Vodafone Idea ने 25 नोव्हेंबरपासून सर्व प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीनंतर Vodafone Idea ग्राहकांना जवळपास 25 टक्के अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान, 26 नोव्हेंबरपासून देशातील अनेक शहरांत Vodafone-Idea कंपनी 5G ट्रायल सुरू (Vodafone-Idea 5G Trial) करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. 'आजपासून आम्ही परिवर्तनासाठी सज्ज आहोत. आजपासून आम्ही 5G ट्रायल सुरू करत आहोत. टेक्नोलॉजीच्या या पुढच्या टप्प्यात आमची साथ द्या' असं ट्विट कंपनीने केलं आहे. हे ही वाचा-Vodafone Idea ग्राहकांना फटका; टॅरिफ प्लॅनसाठी आजपासून नवे दर लागू Airtel च्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ... 219 रुपयांचा प्लॅन 265 रुपये झाला आहे. 249 रुपयांचा रिचार्ज 299 आणि 298 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 359 रुपयांत मिळेल. Airtel चा सर्वात पॉप्युलर 598 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी आता 719 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 84 दिवस वॅलिडिटी असणाऱ्या एयरटेल प्रीपेड प्लॅनची किंमत आता कमीत-कमी 455 रुपये होईल. 598 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 719 रुपये आणि 698 रुपयांच्या प्लॅनची किंमत 839 रुपये झाली आहे. Airtel ने वार्षिक प्रीपेड प्लॅनचे दरही वाढवले आहेत. 365 दिवसांची वॅलिडिटी असणारा 1,498 रुपयांचा प्रीपेड प्लान आता 1,799 रुपये झाला आहे. तर 2,498 रुपयांचा प्लॅन 2,999 रुपये झाला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Reliance Jio, Vodafone, Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या