• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • जगातला एकमेव भारतीय वंशाचा उद्योजक ज्याच्याकडे आहे कोट्यवधींची 'बुगाटी'

जगातला एकमेव भारतीय वंशाचा उद्योजक ज्याच्याकडे आहे कोट्यवधींची 'बुगाटी'

महागड्या बाईक्स आणि कार विकत घेणं हा श्रीमंतांच्या छंदांपैकीच एक छंद. अमेरिकेतील डलास (Dallas US) मध्ये राहणाऱ्या मयूर यांचं वैशिष्ट काय तर जगातील सर्वांत आलिशान कार तयार करणाऱ्या बुगाटी या फ्रेंच कंपनीची शिरोन ही आधुनिक कार असणारे ते डलासमधले पहिले अमेरिकी नागरिक आहेतच पण या कारचे मालक असणारे ते जगभरातील पहिले भारतीय वंशाचे व्यक्तीही आहेत.

 • Share this:
  मुंबई, 1 एप्रिल : एखाद्या गोष्टीची आवड असली की त्यांचा संग्रह करण्याचा छंद अनेकांना असतो. महागड्या बाईक्स आणि कार विकत घेणं हा श्रीमंतांच्या छंदांपैकीच एक छंद. पण या महागड्या आलिशान गाड्या असणारेही अनेक जण जगात आहेत. मग आपलं वेगळेपण कसं जगासमोर येईल हा विचार ही मंडळी करत असतात. असंच एक नाव आहे मयूर श्री (Mayur Shree) या अमेरिकी उद्योजकाचं. अमेरिकेतील डलास (Dallas US) मध्ये राहणाऱ्या मयूर यांचं वैशिष्ट काय, तर जगातील सर्वांत आलिशान कार तयार करणाऱ्या बुगाटी या फ्रेंच कंपनीची शिरोन ही आधुनिक कार असणारे ते डलासमधले पहिले अमेरिकी नागरिक आहेतच, पण या कारचे मालक असणारे ते जगभरातील पहिले भारतीय वंशाचे व्यक्तीही आहेत. भारतातील आणि जगभरातील अनेक भारतीयांकडे बुगाटीच्या कार आहेत, पण त्यांच्याकडे शिरोन ही कार नाही. ती केवळ मयूर श्री यांच्याकडेच आहे. शिरोन का आहे विशेष आणि तिची किंमत काय? बुगाटी कंपनीने केवळ 500 शिरोन कार तयार केल्या असून त्याची जगभर विक्री करण्यात येणार आहे. जगभरातील श्रीमंत आणि नशीबवान लोकांनाच ही कार विकत घेता येणार आहे हे तर स्पष्टच आहे. पण अशा मोजक्या नशीबवान श्रीमंत माणसांपैकी ही शिरोन गाडी खरेदी केलेल्या व्यक्तींमध्ये पहिली भारतीय वंशाची व्यक्ती बनण्याचा मान मयूर श्री यांनी पटकावला आहे. त्यांच्या डलासमधील घरी कंपनीने शिरोन कार पाठवली आहे. ही कार विकत घेण्यासाठी मयूर यांना अनेक कागदपत्रांची पूर्तताही करायला लागली आहे. या कारची किंमत आहे 3 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 22 कोटी रुपये. आलं ना लक्षात कार कशी असेल ते. कोण आहेत मयूर श्री? इतकं वाचल्यावर स्वाभाविकपणे तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहेत हे मयूर श्री? मयूर श्री अमेरिकेतील वेअर हाउस आणि कोल्ड स्टोरेज (Cold Storage Network) व्यावसायिक आहेत. त्यांचा संपूर्ण व्यवसाय दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पसरलेला आहे. डर्बनमधील स्टोरेजचा व्यवसाय हा मयूर यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. डलास न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मयूर यांनी सांगितलं होतं की दक्षिण आफ्रिकेत जाणारी सगळी फळं त्यांच्या वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेजच्या नेटवर्कमध्येच साठवली जातात. मयूर यांचे पूर्वज 1860 मध्ये भारतातून दक्षिण आफ्रिकेत गुलाम म्हणून गेले होते. त्यांच्या आजोबांनी फॅक्टरी कामगार म्हणून काम केलं. मयूर यांच्या वडिलांनी आफ्रिकेत कत्तलखाना सुरू केला. आता हे कुटुंब अमेरिकेतील श्रीमंत कुटुंबांमध्ये गणलं जातं. मयूर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कुटुंबाला आफ्रिकेतून अमेरिकेत स्थायिक होताना अनेक नियमांचं पालन करावं लागलं. अमेरिकी नियमांनुसार EB-5 व्हिसाअंतर्गत अमेरिकी नागरिकत्व म्हणजे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अमेरिकी उद्योगांमध्ये 5 लाख डॉलरची गुंतवणूक करावी लागली होती. या गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती करणं अपेक्षित होतं. त्यासाठी मयूर व कुटुंबियांनी अमेरिकेतील प्रॉपर्टी आणि रियल इस्टेट (US Property and Real Estate) क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. मयूरकडे आहेत कोणकोणत्या कार? जगातल्या सर्वांत महागड्या आलिशान गाडीचं नाव घ्या आणि ती मयूर यांच्या कारच्या ताफ्यात आहेत. * रोल्स रॉइसचं Phantom DHC हे भारतात बघायला दुर्मिळ मॉडेल मयूर यांच्याकडे आहे. * लँबॉर्गिनी एवेंटैडर कन्व्हर्टिबल या कारचं पिवळ्या रंगाचं मॉडेल मयूर यांच्याकडे आहे. * 350 किमी/तास हा सर्वाधिक स्पीड असणारी McLaren P1 स्पोर्ट्स कार मयूर यांच्या गॅरेजची शान वाढवते. * मयूर यांच्याकडे Porsche GT3 RS कारही आहे जिची नंबरप्लेट मयूर यांच्या नावाची आहे. * मयूर यांच्या आईवडिलांनी लग्नात त्यांना एस्टन मार्टिन DBS Superleggera कार भेट दिली होती. ही तीच कार आहे जी जेम्स बॉंडचा ब्रँड म्हणून जगप्रसिद्ध आहे. * मयूर यांच्याकडे लँबॉर्गिनीची Aventador तसंच Urus आणि Murcielago roadster या गाड्याही आहेत.
  First published: