मुंबई, 10 नोव्हेंबर: विम्याशिवाय तुम्ही कोणतंही वाहन चालवू शकत नाही. लोकांच्या सुरक्षेबरोबरच वाहनांच्याही सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार खरेदी करताना विमा पॉलिसी घेतल्यानंतर फार कमी लोक त्याकडे लक्ष देतात. त्याचं पुन्हा नूतनीकरण करताना बहुतेक लोक चालान टाळण्यासाठी थर्ड पार्टी किंवा लोकल कंपनीकडून विमा घेतात. असं केल्यानं अपघात झाल्यास त्यांचं मोठं नुकसान होऊ शकते. एवढंच नाही तर अनेक वेळा योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं लोकांचा जीव जातो. विम्याचा दावा करताना या अडचणी टाळण्यासाठी, त्याचं नूतनीकरण करताना पाच मुख्य गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे. जे तुम्हाला योग्य प्लॅन निवडण्यात मदत करेल. अतिरिक्त शुल्क कसं टाळावं? बहुतेक लोक विमा पॉलिसीची मुदत संपल्यानंतरच त्याचे नूतनीकरण करतात. अशा परिस्थितीत त्यांना अतिरिक्त शुल्क म्हणून 2000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. बहुतेक लोक पेट्रोल पंप किंवा सायबर कॅफेला भेट देऊन ऑनलाइन विमा पॉलिसी घेतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे कंपनीबद्दल आणि योजनेबद्दल चांगली माहिती नसते. तुम्हीही इन्शुरन्स रिन्यू करणार असाल तर स्मार्टफोनच्या मदतीनं तुम्ही घरी बसून ते करू शकता. इतकंच नाही तर अतिरिक्त शुल्कापासूनही बचत होईल. वाहनाच्या स्थितीनुसार प्लॅन अपग्रेड करा- कारचे मूल्य वर्षानुवर्षे घटत जातं. इतकंच नाही तर कालांतरानं हळूहळू बिघाडही होऊ लागतो. हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक विमा योजना घेताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही वाहनावरील अतिरिक्त खर्च वाचवू शकता. त्यामुळे वाहनाचं व्हॅल्यूएशनही वाढते. वेळेनुसार विमा योजना अपग्रेड करत रहा. यासाठी तुम्हाला प्रीमियम म्हणून अधिक पैसे द्यावे लागतील. हेही वाचा: लोन ट्रान्सफर करण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? समजून घ्या प्रक्रिया अन् आवश्यक कागदपत्रे इन्शोर्ड डिक्लियर्ड व्हॅल्यू (IDV)- विमा पॉलिसीच वाहनाच्या मूल्याची माहिती देते. अशा काही कंपन्या आहेत ज्या त्यांच्या वाहनांसाठी खूप कमी क्लेम देतात. एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्ती आणि वाहन चोरीच्या परिस्थितीतही ते दाव्याची रक्कम देण्यास नकार देतात. त्यामुळे, विम्याचे नूतनीकरण करताना IDV म्हणजेच इन्शोर्ड डिक्लियर्ड व्हॅल्यूकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला विम्यासाठी भरावी लागणारी रक्कम पूर्णपणे इन्शोर्ड डिक्लियर्ड व्हॅल्यूवर अवलंबून असते. 20-50% पर्यंत सूट- NCB म्हणजेच विमा काढताना कंपनीकडून नो क्लेम बोनस जारी केला जात नाही. जुन्या पॉलिसीनुसार, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा दावा घेतला नसेल, तर तुम्हाला रिन्यू करताना 20 ते 50% पर्यंत सूट मिळू शकते. याकडे फार कमी लोक लक्ष देतात. त्यामुळं NCB बद्दल नक्कीच जाणून घ्या. अशा परिस्थितीत तुम्ही हजारो रुपये सहज वाचवू शकाल.
विमा कंपनीबद्दल महत्त्वाची माहिती - क्लेम देताना लोकांना त्रास देणाऱ्या अनेक विमा कंपन्या आहेत. काही वेळा या कंपन्या दाव्याची रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार देतात. अशा परिस्थितीत, विमा काढतेवेळी कंपनीची योग्य माहिती गोळा करून तुम्ही यापासून मुक्त होऊ शकता. याशिवाय गॅरेज नेटवर्क कॅशलेस तपासा. कॅशलेस सुविधेअंतर्गत अपघातानंतर, वाहन कोठूनही दुरुस्त केले जाऊ शकते, नंतर विमा कंपनी तुम्हाला हे सर्व पैसे परत करते.