नवी दिल्ली, 7 एप्रिल: वाहन उत्पादक कंपन्यांनी एप्रिल महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ केल्याचं पहायला मिळालं. तर काही कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पेशल ऑफर (Special offers on car purchase) सुद्धा आणल्या आहेत. जपानची मोठी ऑटोमोबाइल निर्माता कंपनी असलेल्या होंडाने (Honda) एप्रिल महिन्यात आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स (Honda cars discount offer) आणल्या आहेत. होंडा कंपनीने आपल्या कारच्या विविध रेंजवर काही कास ऑफर दिली आहे. ज्यामध्ये होंडा अमेझ (Honda Amaze) सारख्या एक्झीक्युटीव्ह कारचाही समावेश आहे. जाणून घेऊयात होंडा कारच्या खास ऑफर्सबद्दल.
Honda City: कंपनीने अलीकडेच आपल्या आलिशान आणि दमदार कारच्या 5th व्हर्जनचे मॉडल बाजारात आणले आहे. कंपनीकडून या कारच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडल्सवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.
Honda Jazz: कंपनीची Honda Jazz ही कार प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कार खरेदीवर ग्राहकांची 32,248 रुपयांची बचत होऊ शकते. यामध्ये 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट किंवा 17,248 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज सारख्या ऑफर्सचा समावेश आहे. ही ऑफर केवळ पेट्रोल व्हेरिएंटवरच उपलब्ध आहे.
हे पण वाचा: Honda च्या दुचाकींसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे, कंपनीने या गाड्यांच्या किमती वाढवल्या
Honda WR-V: होंडा कंपनीची ही प्रसिद्ध एसयूव्ही कार खरेदीवर तुम्ही 32,527 रुपयांची बचत करु शकता. होंडाच्या या कार खरेदीवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट किंवा 17,527 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज सारख्या ऑफर्सचा समावेश आहे. ही ऑफर दोन्ही व्हेरिएंटच्या कार खरेदीवर उपलब्ध आहे.
Honda Amaze: होंडा अमेझ ही कार भारतीय बाजारात विक्री होणारी सर्वात स्वस्ती कार आहे. याममध्ये कंपनीकडून 38,851 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ग्राहकांना देण्यात येत आहे. या कारमध्ये पेट्रोल मॉडेल (SMT व्हेरिएंट सोडून) 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 17,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट किंवा 17,105 रुपयांच्या किमतीच्या अॅक्सेसरिज सारख्या ऑफर्सचा समावेश आहे. तर या कारच्या एसएमटी व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट किंवा 23,581 रुपयांच्या अॅक्सेसरीज सारख्या ऑफर्सचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Discount offer, Investment, Sale offers