मुंबई, 20 ऑगस्ट: इलेक्ट्रिक कारच्या चार्जिंगचं टेन्शन कंपन्या हळूहळू दूर करत आहेत. एकीकडे बॅटरीची रेंज वाढवली जात असताना दुसरीकडे फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे लोकांना इलेक्ट्रिक कार वापरणं अधिक सुलभ होईल. प्रसिद्ध कोरियन कंपनी Kia ने भारतात आपलं सर्वात वेगवान चार्जर स्टेशन उभारलं आहे. हा फास्ट चार्जर सेटअप केरळमधील कोची येथे लावण्यात आला आहे. या चार्जरच्या मदतीने, इलेक्ट्रिक कार 240 kWh DC फास्ट चार्जिंग केलं जाऊ शकतं. कंपनीचं म्हणणं आहे की, या चार्जरच्या मदतीने कार फक्त 30 मिनिटांत 100 टक्के चार्ज होऊ शकते. 18 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत होणार चार्ज- Kia ने या वर्षी जूनमध्ये भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार EV6 लॉन्च केली होती. EV6ला Hyundai आणि Kia च्या कॉमन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर तयार केले आहे. Kia चा दावा आहे की, EV6 एकदा चार्ज केल्यावर 528 किमीपर्यंत धावू शकते. 350 kWh फास्ट चार्जरचा वापर करून EV6 फक्त 18 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. 240 kWh चा चार्जर 30 मिनिटांत इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करू शकतो. सर्व इलेक्ट्रिक कार होऊ शकतात चार्ज- Kia ने कोचीमध्ये उभारलेल्या चार्जिंग स्टेशनवर सर्व कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार चार्ज केल्या जाऊ शकतात. Kia India ने हे वैशिष्ट्य शहरातील आणि आसपासच्या सर्व EV कारधारकांसाठी आणलं आहे. चार्जिंग स्टेशनवर कोणीही त्यांचं इलेक्ट्रिक वाहन चार्ज करू शकेल. यापूर्वी इलेक्ट्रिक कारसाठी जुलैमध्ये गुडगावमध्ये सर्वात वेगवान 150kWh चार्जर सेटअप करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, Kia ने 240 kWh DC फास्ट चार्जर बसवून एक पाऊल पुढं टाकलं आहे. हेही वाचा- UPI च्या नियमात बदल होण्याची शक्यता; काय आहे RBIचं प्लॅनिंग? वाचा सविस्तर Kia EV6 देते 528Kmची रेंज- Kia GT Line RW आणि GT Line AWD या दोन ट्रिममध्ये EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर खरेदी करता येऊ शकते. GT लाइन RWD ची किंमत 59.95 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे, तर GT लाइन AWD ची किंमत 64.95 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) आहे. कंपनीच्या फक्त 100 कार भारतात विकल्या जातील. Kiaच्या या गाडीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. Kia EV6 चे RWD मॉडेल पूर्ण चार्ज केल्यावर 528 किमी पर्यंतची रेंज देते, तर AWD व्हेरियंट एका चार्जवर 425 किमी पर्यंत धावण्यास सक्षम असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.