नवी दिल्ली,09 मे: देशातील सर्वात मोठे डायरेक्ट-टू-होम (DTH) ऑपरेटर डिश टीव्हीने आपल्या वापरकर्त्यांना मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना 30 दिवसांची विनामूल्य सेवा देणार आहे. वापरकर्त्यांनी कंपनीचे दीर्घकालीन प्लॅन्स निवडल्यास या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. डिश टीव्हीकडे (Dish TV) बर्याच योजना आहेत ज्या दीर्घकालीन वैधतेसह मिळतात. या योजनांची वैधता 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्यांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे डिश टीवीच्या इन लॉन्ग-टर्म प्लॅनचा रिचार्ज करण्यासाठी डीटीएच प्लॅनमध्ये मोफत सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त पैसे भरण्याची गरज नाही. डिश टीव्ही आपल्या ग्राहकांना एचडी आणि एसडी चॅनेलसह विविध मिक्स पॅक ऑफर करत आहे. आता वापरकर्ते विनामूल्य सेवांसाठी कंपनीने देऊ केलेल्या दीर्घकालीन योजनांचे रिचार्ज करू शकतात. जर वापरकर्त्यांनी 3 महिन्यांच्या योजनेचे रिचार्ज केला तर कंपनी त्यांना 7 दिवसांची अतिरिक्त सेवा विनामूल्य देईल. या व्यतिरिक्त जर वापरकर्त्यांनी 6 महिने आणि 12 महिन्यांसाठी रिचार्ज केले तर त्यांना अनुक्रमे 15 दिवस आणि 30 दिवस सेवा विनामूल्य मिळेल. याशिवाय 12 महिन्यांच्या योजनेचा रिचार्ज केल्यास फ्री बॉक्स स्वॅप सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे वाचा - Mutual Funds देतायंत मालामाल होण्याची संधी, सलग दोन महिन्यात झाली मोठी गुंतवणूक डिश टीव्हीचा रिचार्ज कसा कराल तुम्ही तुमचे डिश टीव्ही खाते अनेक मार्गांनी चॅनेल पॅकसह रीचार्ज करू शकता. सर्वात सोपी पद्धत म्हणजे कंपनीच्या वेबसाइटवर जाणे आणि ‘क्विक रिचार्ज’ (Quick Recharge) वर क्लिक करणे आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करणे. यानंतर आपल्याला खात्याचा रिचार्ज करण्यासाठी आपला व्हीसी (VC) नंबर किंवा आरएमएन (RMN) नंबर प्रविष्ट करावा लागेल. नवीन अतिरिक्त चॅनेल अॅड करायचे असल्यास अतिरिक्त पैसे देऊन आपण त्याचे सबस्क्रीप्शन घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपण Google पे किंवा फोनपे सारख्या अन्य पेमेंट अॅप्सवरून डिश टीव्ही खात्याचा रिचार्ज करू शकता. याशिवाय तुम्हाला जर कॅशबॅकचा फायदा घ्यायचा असेल तर कंपनीच्या मोबाइल अॅपवर थेट रिचार्ज करून तुम्ही कॅशबॅक घेऊ शकता. हे वाचा - शाहरुख-भन्साळींची जोडी पुन्हा आली एकत्र; बॉलिवूडच्या बादशाहसाठी लिहिली खास कथा आपण नवीन डिश टीव्ही सेट-टॉप बॉक्स (STB) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण कंपनीच्या वेबसाइटवर जाऊ शकता. HD STB चा लाभ कंपनीच्या साइटवरून 1,347 रुपयांमध्ये मिळू शकेल. त्याचवेळी, वापरकर्ते 1 महिन्यासाठी 408 रुपयांचा पॅक निवडू शकतात. या पॅकमध्ये आपण 299 चॅनेल आणि 12 एचडी चॅनेलचा लाभ घेऊ शकता. तसेच डिश टीव्ही Android एसटीबीचीही सेवा पुरवत आहे. वापरकर्त्यांना एका क्लिकवर ओव्हर-द-टॉप (OTT) कंन्टेंट आणि सॅटेलाईट टीव्ही स्ट्रीम करण्याची परवानगी देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.