मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Digital Address Code ने तुमच्या घराचा पत्ता असा समजेल; प्रत्येक नागरिकाला मिळणार QR कोड

Digital Address Code ने तुमच्या घराचा पत्ता असा समजेल; प्रत्येक नागरिकाला मिळणार QR कोड

सध्या देशात 75 कोटींहून अधिक घरं आहेत. या सर्व घरांसाठी डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल. डीएससी (DSC) डिजिटल प्रमाणीकरणाद्वारे (Digital Authentication) प्रत्येक घराचा पत्ता प्रमाणित करेल.

सध्या देशात 75 कोटींहून अधिक घरं आहेत. या सर्व घरांसाठी डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल. डीएससी (DSC) डिजिटल प्रमाणीकरणाद्वारे (Digital Authentication) प्रत्येक घराचा पत्ता प्रमाणित करेल.

सध्या देशात 75 कोटींहून अधिक घरं आहेत. या सर्व घरांसाठी डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल. डीएससी (DSC) डिजिटल प्रमाणीकरणाद्वारे (Digital Authentication) प्रत्येक घराचा पत्ता प्रमाणित करेल.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : केंद्र सरकार लवकरच देशात डिजिटल अॅड्रेस कोड (Digital Address Code) आणत आहे. हा तुमच्या पत्त्याचा आधार लिंक युनिक कोड (Aadhaar Link Unique Code) असेल. त्यामुळं येत्या काळात ऑनलाइन डिलिव्हरीसोबतच अनेक प्रकारच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. खरं तर, हल्ली कुरियर किंवा डिलिव्हरी बॉय अचूक पत्ता असूनही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. गुगल मॅप (Google Map) सुद्धा अशा वेळी फारसं उपयोगी ठरत नाही. मात्र, सरकार लवकरच यावर एक पर्याय घेऊन येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला एक युनिक कोड (Unique Code) उपलब्ध करून दिला जाईल.

वास्तविक, या कोडच्या मदतीने लोक क्यूआर कोडप्रमाणे (QR Code) टाइप करून किंवा स्कॅन करून घराचं अचूक स्थान शोधू शकतात. यामुळं आपल्याला पत्ता सेव्ह करण्याची देखील आवश्यकता नाही. या कोडच्या मदतीने सर्व कामं पूर्ण होतील. म्हणजेच, या कोडमध्ये तुम्ही डिजिटल नकाशेदेखील (Digital Maps) पाहू शकाल.

सध्या देशात 75 कोटींहून अधिक घरं आहेत. या सर्व घरांसाठी डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल. डीएससी (DSC) डिजिटल प्रमाणीकरणाद्वारे (Digital Authentication) प्रत्येक घराचा पत्ता प्रमाणित करेल. त्याच वेळी, डिजिटल अॅड्रेस कोड तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची स्वतंत्रपणे ओळख तयार केली जाईल. तसेच पत्ता भूस्थानिक निर्देशांकांशी (geospatial coordinates) जोडला जाईल. यासह, प्रत्येक व्यक्तीचा पत्ता नेहमी क्रमांक आणि अक्षरं (numbers and letters) असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकतो. हा कोड कायमस्वरूपी कोड असेल.

हे वाचा - Hair Problems: केसांच्या अनेक समस्यांवर तांदळाचे पीठ आहे गुणकारी, या 3 पद्धतींनी करा उपयोग

DAC कसं करेल काम?

खरेतर, दळणवळण विभागाने या प्रस्तावावर टपाल विभागाकडून आधीच अभिप्राय मागवला होता, ज्याची मुदत 20 नोव्हेंबर रोजी संपली होती. अशा परिस्थितीत लवकरच प्रत्येक घरात डिजिटल युनिक कोड (Digital Unique Code) असेल. तो पिन कोड (PIN-Code) सारखा असेल. त्याच वेळी, तो प्रत्येक घरासाठी डिजिटल समन्वयक म्हणून काम करेल.

हे वाचा - Vodafone Idea आणि Airtel नंतर Jioचेही Recharge महागले; जाणून घ्या नवे दर

DAC चा काय होईल फायदा

याच्यामुळं प्रत्येक घरासाठी ऑनलाइन पत्ता पडताळणी (Online Address Verification) सहजपणे करता येईल. बँकिंग, विमा, टेलिकॉमचे ई-केवायसी (E-KYC) सोपं केलं जाईल. ई-कॉमर्ससारख्या सेवेसाठी DAC खूप उपयुक्त ठरू शकते. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी DAC ची खूप मदत होणार आहे. तसंच फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. मालमत्ता, कर आकारणी, आपत्ती व्यवस्थापन आणि जनगणना आणि लोकसंख्या नोंदी तयार करण्यात मदत करा. DAC वन नेशन वन अॅड्रेसचं (one nation one address) स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल.

First published:

Tags: Digital services, Top news india