मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट

फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट

सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं पाहता सरकारही वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतं. सायबर क्राईमबद्दल (Cyber Crime) लोकांना जागरूक (alert) करण्यासाठी गृह मंत्रालयाने (Home Ministry) सायबर दोस्त नावाचं अ‌ॅप (Cyber Dost App) तयार केलंय.

सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं पाहता सरकारही वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतं. सायबर क्राईमबद्दल (Cyber Crime) लोकांना जागरूक (alert) करण्यासाठी गृह मंत्रालयाने (Home Ministry) सायबर दोस्त नावाचं अ‌ॅप (Cyber Dost App) तयार केलंय.

सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं पाहता सरकारही वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतं. सायबर क्राईमबद्दल (Cyber Crime) लोकांना जागरूक (alert) करण्यासाठी गृह मंत्रालयाने (Home Ministry) सायबर दोस्त नावाचं अ‌ॅप (Cyber Dost App) तयार केलंय.

नवी दिल्ली, 14 जानेवारी: डिजिटल जगात (Digital World) फसवणूक करण्याच्या नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत. फोन कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स घरबसल्या लोकांची बँक खाती रिकामी करतात. सायबर गुन्हेगार नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. कोरोनाच्या काळात ज्या वेगाने ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल पेमेंट वाढलंय, त्यामुळं सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंक्स, आकर्षक ऑफर्स आणि अनोळखी (Cyber Dost Alert) कॉल्सपासून सावध राहावे.

सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं पाहता सरकारही वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतं. सायबर क्राईमबद्दल (Cyber Crime) लोकांना जागरूक (alert) करण्यासाठी गृह मंत्रालयाने (Home Ministry) सायबर दोस्त नावाचे अॅप (Cyber Dost App) देखील तयार केलं आहे.

सायबर दोस्तने दिला अलर्ट

नुकताच सरकारनं सायबर दोस्तच्या माध्यमातून एका नव्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. सरकारनं लोकांना OTP द्वारे होणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलंय. सरकारचं म्हणणं आहे की, एखाद्याला कॉल करूनही OTP चोरला जाऊ शकतो.

अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलत असताना कधीही कॉल मर्ज (Call Merge) करू नये, असा सल्ला सरकारने दिला आहे. कॉल मर्ज होताच, फसवणूक करणारे ओटीपी जाणून घेऊन तुमचं खातं हॅक (hack) करू शकतात. याची जाणीव ठेवा, सावध राहा. तुम्ही फसवणुकीचे बळी असाल तर तुम्ही तुमची तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवू शकता.

वैयक्तिक माहिती शेअर करू नका

डिजिटल पेमेंट करताना तुमच्या फोनवर OTP नंबर येतो. या OTP नंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होईल. लक्षात ठेवा की तुमचा OTP नंबर कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. बँक खाते, एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड माहिती शेअर केल्यानं तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

WhatsApp हे सुरक्षित व्यासपीठ नाही

सायबर सिक्युरिटी (Cyber Security) कंपनी कॅस्परस्कीचे संचालक दिमित्री बेस्टुझेव्ह म्हणतात की व्हॉट्सअॅपमध्ये अनेक सुरक्षेतील त्रुटी (Security error) आहेत. वापरकर्त्यांनी त्यांची कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती WhatsApp वर शेअर करू नये.

हे वाचा - Mistake during Workout: व्यायाम करताना 80 टक्के लोक ही चूक करतात; तुमची पद्धत बरोबर आहे ना?

दिमित्री बेस्टुझेव्ह म्हणाले की, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, अनेकांना जरी सुरक्षित वाटत असलं तरी व्हॉट्सअॅप हे सुरक्षित व्यासपीठ नाही. ते म्हणाले की, स्कॅमर (Scammer) व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी मोठ्या संधी शोधत आहेत.

First published:

Tags: Cyber crime, Financial crime