Home /News /auto-and-tech /

तुम्हालाही मतदान ओळखपत्रावरील पत्ता बदलायचा आहे का? घरबसल्या ऑनलाईन होईल काम

तुम्हालाही मतदान ओळखपत्रावरील पत्ता बदलायचा आहे का? घरबसल्या ऑनलाईन होईल काम

तुम्ही जिथे कुठे नव्या ठिकाणी जात आहात, तिथं मतदार ओळखपत्र कसं तयार होणार आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. घरबसल्या तुमच्या मतदार ओळखपत्राचा पत्ता (Change Voter Id Address ) बदलण्यासाठी काही सोप्या स्टेप्स.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 जानेवारी : तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत असाल किंवा इतर कोणत्याही कारणाने तुम्हाला मतदान ओळखपत्रावरील पत्ता बदलायचा असेल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की, तुम्ही जिथे कुठे नव्या ठिकाणी जात आहात, तिथं मतदार ओळखपत्र कसं तयार होणार आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. जाणून घ्या, घरबसल्या तुमच्या मतदार ओळखपत्राचा पत्ता (Change Voter Id Address ) बदलण्यासाठी काही सोप्या स्टेप्स. ग्रामपंचायतीपासून ते संसंदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान ओळखपत्र महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया चालू असली तरी अद्याप आयोगाच्या माहितीनुसार मतदानासाठी ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तुमचं मतदार ओळखपत्र (how to make voter id) त्वरित बनवून घ्या, अपडेट ठेवा. घरबसल्या बसल्या मतदार कार्डमधील पत्ता बदला >> सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल व्होटर्स सर्व्हिस (Correction of entries in electoral roll) पोर्टलवर लॉग इन किंवा नोंदणी करावी लागेल. >> यानंतर 'मतदार यादीतील नोंदी दुरुस्ती' हा विभाग निवडावा लागेल. >> नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला फॉर्म 8 दिसेल. त्यावर क्लिक करा. >> आता मतदार ओळखपत्रात दुरुस्तीचा पर्याय दिसेल. हे वाचा - Coronavirus symptoms : कोविड-19 ला साधा फ्लू समजू नका, WHO ने दिला हा इशारा >> येथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि तुमचा पत्ता देखील भरा. >> माहिती दिल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात पत्ता पुरावा म्हणून आधार (aadhar), वाहन चालक परवाना (driving license) समाविष्ट आहे. >> आता तुम्हाला जी माहिती बदलायची आहे ती निवडायची आहे. जर त्यात नाव असेल तर नावाचा टॅब निवडा आणि आणखी काही असल्यास त्याचा टॅब निवडा. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात >> आता तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल अॅड्रेस सबमिट करावा लागेल. >> आता सबमिट पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफिकेशन केल्यानंतर काही काळात तुम्हाला मतदार ओळखपत्र पाठवलं जाईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Voting, Voting awarness

    पुढील बातम्या