जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / चायनीज Smart TV तुमची माहिती चोरतात? पाहा काय आहे सत्य

चायनीज Smart TV तुमची माहिती चोरतात? पाहा काय आहे सत्य

चायनीज Smart TV तुमची माहिती चोरतात? पाहा काय आहे सत्य

चायनीज टीव्ही ब्रँड्सना (Chinese TV Brands) भारत, उत्तर अमेरिकेसह अनेक बाजारपेठांमध्ये मागणी सातत्याने वाढत आहे; मात्र या टीव्हीद्वारे ग्राहकांवर हेरगिरी (Spying) केली जात असल्याची शंका निर्मा केली गेली आहे आणि वाढूही लागली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 5 मे : चायनीज  टीव्ही ब्रँड्सना (Chinese TV Brands)  भारत उत्तर अमेरिकेसह अनेक  बाजारपेठांमध्ये मागणी सातत्याने वाढत आहे मात्र या टीव्हीद्वारे  ग्राहकांवर हेरगिरी (Spying)  केली जात असल्याची शंका निर्मा केली गेली आहे आणि  वाढूही लागली आहे. स्कायवर्थ (Skyworth)  या चायनीज टीव्ही कंपनीने आपल्या  काही स्मार्ट टीव्ही (Smart TV)  युझरची माहिती गोळा करत असल्याचं सांगितलं.  तसंच आपल्या टीव्हीत प्रीलोडेड असलेल्या एका थर्ड-पार्टी अॅपवर त्याचं  खापर फोडलं.  स्कायवर्थ टीव्हीमध्ये गोझन सर्व्हिस (Gozen Service)  नावाचं अॅप असून टीव्ही ज्या वाय-फाय नेटवर्कला (Wi-Fi Network)जोडलेला  आहे त्या नेटवर्कमधील अन्य गॅजेट्सबद्दलची माहिती त्या अॅपद्वारे गोळा  केली जात होती. गोझन डेटा नावाच्या कंपनीने गोझन सर्व्हिस अॅप (Gozen Service App)विकसित केलं असून ओटीटी सर्व्हिसेस साठीचा मोठा विश्लेषण  प्लॅटफॉर्म असल्याचा त्या कंपनीचा दावा आहे. ही कंपनी चीनच्या बीजिंग येथेआहे. त्या अॅपचा हा कारभार कळल्यावर ते टीव्हीमधून डिसेबल करण्यात आल्याचा  दावा स्कायवर्थ कंपनीने केला आहे. V2EX  या चायनीज डेव्हलपर फोरमवर  युझर्सच्या याबद्दलच्या पोस्ट आल्यानंतर स्कायवर्थ कंपनीने माफी मागितली  आहे. ग्राहकांकडे असलेले स्कायवर्थ टीव्ही दर काही मिनिटांनी वाय-फाय  नेटवर्क स्कॅन करतात असं नेटवर्क ट्रॅफिकवरून लक्षात आल्याचं त्या  पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याच वाय-फाय नेटवर्कमध्ये कनेक्टेड असलेल्या  उपकरणांची डिव्हाइस नेम्स,आयपी अॅड्रेसेस नेटवर्क लेटन्सी आणि रेंजमध्ये  असलेली अन्य नेटवर्क्स आदी प्रकारची माहिती त्या टीव्हीकडून गोळा केली जात  असल्याचं युझर्सनी लिहिलं होतं. स्कायवर्थ कंपनीने त्यानंतर एकनिवेदन प्रसिद्ध केलं.  स्कायवर्थ टीव्ही अर्थात शेन्झेन चुआंगवै-आरजीबी  इलेक्ट्रॉनिक कंपनी या कंपनीच्या मालकीची दुसरी कंपनी असलेली शेन्झेन कुकाई  नेटवर्क टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड या कंपनीचा आणि गोझन डेटा या कंपनीचा  व्यवसाय विषयक करार झाला होता. मेनलँड चायनामधल्या टीव्ही प्रोग्राम्सचा  नमुना तत्त्वावर सर्व्हे करण्यापुरता हा करार मर्यादित होता. त्या पलीकडे  जाऊन कोणत्याही प्रकारचा डेटा गोळा करण्याची परवानगी स्कायवर्थ टीव्हीने  दिलेली नाही,’  असं त्या निवेदनात म्हटलं होतं. स्कायवर्थ टीव्ही  कंपनीकडून अन्य देशांत विकल्या गेलेल्या टीव्ही मॉडेल्समध्येही ते  स्पायवेअर अॅप (Spyware)होतं की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आमच्या  करारानुसार हे अॅप बसवण्यात आलं होतं. ते युझर्सकडून डिसेबल करता येणं  शक्य आहे. टीव्हीवरील कोणते कार्यक्रम पाहिले जातात जाहिराती किती  पाहिल्या जातात कार्यक्रमांचं रेटिंग काय वगैरे विश्लेषणासाठी त्याद्वारे  माहिती गोळा केली जात होती,’  असं गोझन डेटा कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या  निवेदनात म्हटलं आहे. जर्मन कंपनी विकत घेतल्यानंतर भारतात  स्कायवर्थ कंपनीचे टीव्ही  मेट्झ’ (Metz)  या ब्रँडिंगने विकले जातात. मेट्झ  टीव्हीमध्येही हे अॅप आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  युझर्सची गोपनीयता आणि त्यांच्या डेटाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे  पार्टनर्स आणि सेवा पुरवठादारांच्या कृतींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवू असं  स्कायवर्थ कंपनीने सांगितलं आहे. अर्थात,चायनीज टीव्ही  मॉडेल्समधील प्रायव्हसी उल्लंघनाबद्दल (Privacy)  शंका घेतली जाण्याची ही  पहिलीच वेळ नाही. अँड्रॉइड सिस्टीमवर चालणाऱ्या टीसीएल टीव्हीमध्ये (TCL TVs)  सुरक्षिततेचा मुद्दा असल्याचा दावा गेल्या वर्षी काही सुरक्षा  संशोधकांनी केला होता. त्या डिव्हाइसच्या सुरक्षिततेत असलेल्या उणिवेमुळे  डिव्हाइसच्या संपूर्ण फाइल सिस्टीमवर ताबा मिळवणं फाइल ओव्हरराइट करणं  शक्य असल्याचं त्या दाव्यात म्हटलं होतं. युझरनेम पासवर्ड किंवा अशा  कोणत्याही यंत्रणेशिवाय हे करणं शक्य होतं. पिट्सबर्गमधल्या कार्नेगी मेलॉन  युनिव्हर्सिटीतल्या यूएस कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला युझर्सनी  याबद्दल माहिती दिल्यावर त्याला  CVE-2020-27403  आणि  CVE-2020-28055  हे कॉमन  व्हल्नरॅबिलिटी अँडज एक्स्पोजर कॅटलॉग नंबर्स देण्यात आले. त्यानंतर  संबंधित कंपनीने ही समस्या सोडवण्यासाठी पॅचिंग केलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: china , spyware , Tv
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात