सचिन जिरे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 17 सप्टेंबर : सेल्फी (Selfie) काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि आपण जाऊ त्या ठिकाणी, संधी मिळेल तिथे अनेकजण सेल्फी क्लिक करत असतात. मात्र, हाच सेल्फी एका तरुणाच्या जीवावर बेतला असता. औरंगाबादमधील (Aurangabad) अजिंठा लेणी (Ajanta Caves) परिसरात सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाचा तोल गेला आणि तो थेट कुंडात कोसळला.
सेल्फी काढताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंडा पैकी असलेल्या एका कुंडामध्ये एक महाविद्यालयीन तरुण पडला. वेळीच ही बाब उपस्थितांच्या लक्षात आल्याने सुदैवाने त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्याला दोरीच्या साह्याने स्थानिकांनी बाहेर काढले.
सेल्फीच्या नादात तोल गेला अन् अजिंठा लेणीतील कुंडात पडला pic.twitter.com/U66hD8gd3D
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2021
मुंबईतील मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग
अजिंठा लेणीमध्ये सात कुंड आहेत, त्यातील पहिल्या कुंडात तरुण पडला होता. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी अजिंठा लेणीच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडली. सप्त कुंडाच्या सुरुवातीला सेल्फी काढत असताना एकाचा तोल गेला आणि खोलवर असलेल्या गोलाकार कुंडामध्ये तो पडला होता.
सेल्फी क्लिक करण्याच्या नादात अपघात होऊन अनेकांचे जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा बातम्या सुद्धा अनेकदा येतात मात्र, असे असले तरी नागरिक आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता सेल्फी काढण्यात मग्न होतात. सुदैवाने या तुरणाला स्थानिकांनी बाचवले. अशा प्रकारे आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Selfie