
राज्यात कोरोनाचा कहर असल्याने सर्व सण-उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केले आहे. अशातचं एक दुर्देवी घटना समोर आली आहे.

जालना तालुक्यातील पीरपिंपळगावातील रवी कावळे यांच्या शेतातील एका दुर्देवी घटना घडली असून शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यातील कुंभार गल्ली पाणीवेस येथे राहणारा गजानन जोरले (वय 32) आणि सोनल नगर जुनं जालना येथे राहणारा कैलास खरात (वय 30) याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

हे दोघे मित्र होळी निमित्त शेततळ्यात पोहोण्यासाठी गेले असता येथे बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.




