औरंगाबाद, 08 जून: जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या इमारतीवर 20 मे रोजी एका 45 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली होती. सिडको पोलीसांनी सखोल चौकशी करत 17 दिवसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलीसांनी मिस्त्रीकाम करणाऱ्या 23 वर्षीय सुनील जयसिंग निभोंरे याला अटक केली आहे. आरोपी सुनीलने हत्येची कबुली दिली असून प्रेयसीची छेड काढल्यामुळे (Girlfriend molestation) हत्या केल्याचं त्यानं सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत. 21 मे रोजी सकाळी सुरेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या 45 वर्षीय दादाराव सांडू सोनवणे यांचा मृतदेह जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर आढळला होता. दुसऱ्या दिवशी मृताची ओळख पटल्यापासून मृत दादाराव यांची हत्या नेमकी कोणी केली? याचं गूढ बनलं होतं. पण सिडको पोलिसांनी 17 दिवसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी दोन पथकं तयार करून घटनेबाबतचे धागेदोरे जमवायला सुरुवात केली. दरम्यान आरोपी सुनील हा आपल्या 25 वर्षीय प्रेयसीला घेऊन याठिकाणी येतो, अशी माहिती सिडको पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी सुनील निंभोरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण आरोपी सुनीलने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, हे ही वाचा- चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची केली हत्या, 5 दिवसानं आरोपीनं जेलमध्ये घेतला गळफास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिलचे एका 25 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो आपल्या प्रेयसीला घेऊन नेहमी जाधववाडी येथील व्यापारी संकुलाच्या छतावर येऊन बसायचा. 20 मेच्या रात्रीही आरोपी सुनील आपल्या प्रेयसीला घेऊन याठिकाणी गेला. पण यावेळी मृत दादाराव अगोदरपासूनचं छतावर बसले होते. त्यांना पाहून सुनीलचा हिरमोड झाला तरीही तो प्रेयसीसोबत तिथेच बसला. थोड्या वेळाने आरोपी सुनील लघुशंकेसाठी गेला असता मृत दादारावने सुनीलच्या प्रेयसीची छेड काढली. हे पाहून राग अनावर झालेल्या सुनीलने सिमेंटच्या गट्टूने दादाराव यांच्या डोक्यात वार करत त्यांची ठेचून हत्या केली. यानंतर आरोपी प्रेयसीला घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







