जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / मित्रानेच केला घात; डोंगरात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, औरंगाबादमधील घटना

मित्रानेच केला घात; डोंगरात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, औरंगाबादमधील घटना

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Rape in Aurangabad: वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुण हा पीडित मुलीचा मित्र आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 08 जून: वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुण हा पीडित मुलीचा मित्र (Friend) आहे. आरोपीने आपल्या मैत्रिणीला गप्पा मारण्याच्या बहाण्याने खवड्या डोंगर परिसरात दुचाकीवरून नेलं. याठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीसांनी आरोपीवर बलात्कार, अपहरण आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित अटक केलेल्या 22 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव सोमेश भिकुलाल मुंगसे असून तो तिसगाव येथील रहिवासी आहे. आरोपीने पीडित मुलीसोबत काही दिवसांपूर्वी मैत्री केली होती. विश्वास संपादन केल्यानंतर, 4 जून रोजी आरोपी पीडितेला गप्पा मारण्याचा बहाणा करत दुचाकीवरून खवड्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीने संधीचा फायदा उचलत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला. दुसरीकडे, आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला स्वतःच्या घरी नेलं. पीडित मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे तिला आजची  रात्र आपल्या घरात राहु द्यावं, अशी विनंती आरोपीने आपल्या आई वडिलांना केली. त्यामुळे आरोपीच्या पालकांनीही पीडितेला आपल्या घरात एका रात्रीसाठी आसरा दिला. दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला सिडको येथील एका उद्यानासमोर सोडून फरार झाला. भेदरलेल्या अवस्थेत असणाऱ्या पीडित मुलीची माहिती स्थानिक नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. हे ही वाचा- जीवनसाथी वेबसाईटवरून 15 तरुणींना अडकवलं हनी ट्रॅपच्या जाळ्यात, हॅकर तरुणाला अटक यानंतर सायंकाळी 6 च्या दरम्यान पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं. आणि मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. पीडितेची मानसिकता लक्षात घेऊन पालकांनी मुलीची विचारपूस केली. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी 6 जून रोजी रात्री उशीरा आरोपी तरुणाला औद्योगिक परिसरातून अटक केली. 7 जून रोजी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात