नवी दिल्ली, 03 डिसेंबर : सूर्यग्रहण (Solar Eclipse) शनिवार, 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3:07 वाजता संपेल. अंटार्क्टिका व्यतिरिक्त हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अटलांटिक देशांतून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात मात्र दिसणार नाही, तसेच हे सूर्यग्रहण उपछाया ग्रहण असेल, ज्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. त्यामुळे संबंधित गृहीतकेही लागू होणार नाहीत. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 8 मिनिटांचा असेल, ज्याचा सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होईल. तथापि, ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, जे केल्याने अशुभ परिणाम टाळता येतात. याबाबत 'आज तक'ने बातमी दिली आहे. जाणून घ्या राशीनुसार होणारे (Surya Grahan/Solar Eclipse December 2021 Date and Time) परिणाम आणि उपाय...
सूर्य ग्रहण 2021 राशीचक्र
मेष : मेष राशीसाठी हे ग्रहण शुभ नाही. ग्रहणानंतर तब्येत बिघडू शकते. अपघात वगैरे होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.
वृषभ : वृषभ राशीसाठी हे ग्रहण शुभ राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नवीन करार होतील.
मिथुन : हे ग्रहण शुभ राहील, जुन्या वादातून सुटका होईल. इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
कर्क : हे ग्रहण शुभ नाही. मित्रांसोबत अनावश्यक वाद होऊ शकतात, मुलांच्या बाजूने तणाव राहील.
सिंह: हे ग्रहण शुभ आणि आर्थिक लाभाचे संकेत देत आहे. जमीन आणि इमारतीशी संबंधित समस्या सुटतील.
हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा
कन्या : सूर्यग्रहणाचा प्रभाव या राशीसाठी शुभ आहे. धैर्य आणि पराक्रम वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.
तूळ : तूळ राशीसाठी अशुभ प्रभाव राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वाद टाळा, तब्येत बिघडू शकते.
वृश्चिक : या राशीत सूर्यग्रहण राहील, त्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते. या ग्रहणानंतर काही तणाव संभवतो, ज्यामुळे कार्यक्षेत्रात अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
धनु : धनु राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण लाभदायक ठरेल. म्हणजेच या ग्रहणानंतर खर्च वाढू शकतो. विनाकारण धावपळ होईल, परदेश प्रवासाचेही योग आहेत.
मकर : सूर्यग्रहणाचा प्रभाव शुभ राहील. व्यवसायात प्रगती होईल, तर नोकरदारांना पदोन्नतीचे संकेत आहेत.
कुंभ : समाजात प्रतिष्ठेबरोबरच संपत्तीही लाभेल. जमिनीच्या इमारतीशी संबंधित समस्या दूर होतील.
मीन: सूर्यग्रहणाचा प्रभाव अशुभ राहील. अध्यात्मिक कार्यात अनास्था राहील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबत अवास्तव वाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
हे वाचा - भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला, आणखी काही प्रवासीही पळाले
अशुभ परिणाम टाळण्यासाठी हे उपाय करा
1- सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करणे सर्वात योग्य आहे.
2- सूर्यग्रहण काळात भगवान शिवाच्या कोणत्याही मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
3- जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्र किंवा मृत्युंजय मंत्राचा जप करावा.
4- जर तुम्हाला कोणतीही मोठी अडचण असल्यास ग्रहण काळात संकल्प करून दान कर्म करावे.
5- सूर्यग्रहण काळात भगवान शिव आणि माता काली यांची पूजा करावी.
6- ग्रहणकाळात धर्मग्रंथांचा अभ्यास करत देवाशी लीन व्हावे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.