जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / Margashirsha Purnima 2021: मार्गशीर्ष पौर्णिमेला शुभ योग, 'हे' व्रत केल्यास मिळते सुख-समृद्धी

Margashirsha Purnima 2021: मार्गशीर्ष पौर्णिमेला शुभ योग, 'हे' व्रत केल्यास मिळते सुख-समृद्धी

Margashirsha Purnima 2021: मार्गशीर्ष पौर्णिमेला शुभ योग, 'हे' व्रत केल्यास मिळते सुख-समृद्धी

मार्गशीर्ष महिना हा व्रत-वैकल्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात प्रामुख्यानं श्रीखंडोबा नवरात्र, चंपाषष्ठी, श्रीदत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा हे दिवस व्रतवैकल्य, कुळधर्म, कुळाचारांच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचे असतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 19 डिसेंबर : मार्गशीर्ष महिना हा व्रत-वैकल्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात प्रामुख्यानं श्रीखंडोबा नवरात्र, चंपाषष्ठी, श्रीदत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा हे दिवस व्रतवैकल्य, कुळधर्म, कुळाचारांच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचे असतात. तसंच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रतदेखील अनेक महिला करतात. परंतु, या सर्वांत मार्गशीर्ष पौर्णिमेचं (Margashirsha Purnima) महत्त्व अधिक आहे. या दिवशी भगवान नारायण यांची पूजा (Puja) केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला जो कोणी व्यक्ती व्रत आणि विधिवत पूजा करतो, त्याला जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते, असं मानलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या विशेष व्रताची माहिती `आज तक`ने दिली आहे. यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी (18 डिसेंबर 21) सुरु होत असून, ती 19 डिसेंबर असेल. ज्योतिष अभ्यासकांच्या मते 18 डिसेंबरला व्रत करणं शुभ आहे. 19 डिसेंबर म्हणजे रविवारी स्नान आणि दानाचं महत्त्व अधिक आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रताचं शुभ फळ मिळावं यासाठी काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष मानली जात आहे. कारण मंगळ (Mars) आणि केतु (Ketu) हे दोन्ही महत्त्वाचे ग्रह सध्या वृश्चिक राशीत (Scorpion) आहेत. मंगळ आणि केतुची युती ही आध्यात्मिकदृष्टया वृद्धिंगत करणारी असते. त्यामुळे ही पौर्णिमा अधिक फलदायी ठरेल असं मानलं जात आहे. पौराणिक मान्यतेनुसार, मार्गशीर्ष पौर्णिमेला व्रत आणि विधिवत पूजा केल्यास भगवान विष्णूंची (Bhagwan Vishnu) कृपादृष्टी प्राप्त होते. या दिवशी पवित्र स्थळी, नदीत, तलावात किंवा सरोवरात तुळशीतील मातीने स्नान करावे. या दिवशी केलेलं दान हे वर्षातील अन्य पौर्णिमांच्या तुलनेत 32 पट जास्त असते. त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असंही म्हणतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण पूजादेखील केली जाते. एकूणच मार्गशीर्ष महिना दान-धर्म, धार्मिक कार्य आणि देवदेवतांच्या पूजनासाठी उत्तम मानला जातो. त्यातच मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेल्या व्रत आणि पुजेमुळे अधिक लाभ होतो, असं मानलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत करताना काही गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे. ज्या दिवशी व्रत करायचं आहे, त्यादिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्योदयापूर्वी स्नान करावं. एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करावं. मार्गशीर्ष पौर्णिमेचा उपवास श्रद्धा आणि निष्ठेनं करावा. व्रताच्या संपूर्ण फलप्राप्तीसाठी यथाशक्ती दानधर्म करावा. कांदा, लसूण, मांस, मासे, मद्य आदी गोष्टी वर्ज्य कराव्यात. या दिवशी उपवास करत असाल तर दुपारच्या वेळी झोपणं कटाक्षानं टाळावं, असं आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: mars
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात