
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) - जिथून अपेक्षित रिझल्ट्स मिळणार नाहीत, तिथे संवाद साधू नका. नव्या कल्पनांनी तुमचं विचारविश्व व्यापेल. तणावाच्या काही क्षणांनंतर बऱ्याच काळासाठी आराम मिळेल. तुम्हाला दिलेली कामं वेळेत पूर्ण करा. LUCKY SIGN - बोन चायना कप (A bone china tea mug)

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)- किचकट वाटणारी गोष्ट तुम्ही लिलया हाताळाल. कोणत्याही गोष्टींची विनाकारण भीती बाळगू नका. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भटकंतीच्या पर्यायांवर मर्यादा येतील. LUCKY SIGN - निळं चिन्ह ( a blue logo)

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) - आता रिमाइंडर्स खूप झाले. वेळ आहे ठराविक वेळापत्रक फॉलो करण्याची. दूरचे नातेवाईक भेटीला येणार असल्यास त्यांचं येणं लांबणीवर पडेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी आव्हानं निर्माण होत आहेत. त्यासाठी तयार राहा. LUCKY SIGN - नवीन पेन (a new pen)

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) - नव्या लोकांपासून थोडंसं अंतर राखाल. काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण त्यावर कोणताही निष्कर्ष तुम्ही आत्ताच काढणार नाही. आजच्या दिवसात घरामुळे स्थिरता लाभेल. LUCKY SIGN - लोककथा (a folklore)

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)- तुमच्या भावना जास्त वेळ मनात ठेवू नका. तुमच्या जवळची व्यक्ती तुम्ही त्यांच्याकडे मन मोकळं करण्याची वाट पाहत आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रभावी व्यक्तीच्या ओळखीमुळे तुमचं काम होईल. LUCKY SIGN - उत्साही पाळीव प्राणी (an excited pet)

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)- अर्थकारणाच्याबाबतीत अखेर तुम्हाला प्रगती होताना दिसेल. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग सक्रिय झाले आहेत. नव्या कामासाठी स्वतःला तयार करा. संकटातल्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल. LUCKY SIGN - पाणी भरलेला जग (A jug half full)

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) - आता नव्या सहयोगाचे पर्याय दिसतील, पण त्याबाबतीत निवड करण्यास तुम्ही घाईने उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्याल. तुमचा बराच वेळ ऑनलाइन जात असल्याचं तुमच्या निर्दशनास येईल. LUCKY SIGN - जुना अल्बम (an old album)

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)- तुम्हाला संगीताची आवड असली, तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. घरी राहून आराम करण्यातही अडचणी येतील. LUCKY SIGN - An amethyst crystal

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) - वेळेत मिळालेल्या मदतीने तुम्हाला जणू जीवनदान मिळेल. कामाच्या बाबतीतल्या अनेक जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला तणाव जाणवेल. दिवसाअखेर आलेल्या काही गंभीर स्वरूपाच्या कामांमुळे तुम्हाला जागरण होईल. LUCKY SIGN - Abstract पेटींग (an abstract art painting)

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)- सुंदर सुशोभीकरणाच्या वस्तू तुमचं लक्ष वेधतील. तुमच्या कला कौशल्यामुळे आज तुमची निराशा होणार नाही. एखाद्या मित्रामुळे तुमचा मूड चांगला होईल. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती आज व्यग्र राहतील. LUCKY SIGN - रुबिक्स क्यूब (Rubik’s cube)

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) - तुमच्या भूतकाळातल्या कमिटमेंट्स त्रासदायक ठरू शकतात. एखादा प्रशंसक आता गुप्तपणे जवळ येण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला आज तुमच्याच कोषात राहायला आवडेल. पचनासंबंधीच्या साधारण समस्या जाणवू शकतील. LUCKY SIGN - चांदीचे दागिने (a silver jewelry)

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) - लवकरच तुम्हाला विशेष ओळख मिळण्याचे संकेत आहेत. चर्चेनंतर तुम्ही एखादी नवी योजना किंवा व्यवस्थेसाठी तुमचा होकार द्याल. हा वेळ तुमच्यासाठी चांगला ब्रेक प्लॅन करण्यासाठी योग्य आहे. त्वचेची जळजळ होत असल्यास वेळीच लक्ष द्या. LUCKY SIGN - पाम ट्री (a palm tree)




