गाडीच्या स्टेअरिंगमध्ये अडकलं तरुणाचं डोकं
नवी दिल्ली, 04 जून : कोण कधी अडचणीत सापडेल काही सांगता येत नाही. संकट कसं समोर येईल याचाही भरवसा नसतो. अचानक येणाऱ्या संकटावेळी आपल्या आजूबाजूला असणारे कोण लोक आपली मदत करतात हे महत्त्वाचं असतं. अनेक अशाही घटना घडल्या आहेत की लोक आपल्या समोर संकटात असलेल्या लोकांना वाचवण्याचा किंवा त्यांना त्यातून बाहेर काढण्याचाही प्रयत्नही करत नाहीत. उलट त्याचा व्हिडीओ बनवण्यास सुरु करतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाचं डोकं स्टेअरिंगमध्ये अडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की तो तिथे कसा अडकला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याचे साथीदार मित्र बाजूला बसले असूनही त्याची मदत करत नाहीत.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणाचे डोके गाडीच्या स्टेअरिंगच्या आत अडकल्याचं दिसत आहे. त्याचे डोके बाहेर काढण्याचा तो वारंवार प्रयत्न करत आहे, पण त्यात काही त्याला यश येत नाही. त्याच्या मागे एक मित्र बसलेला आहे मात्र तोही त्याची मदत करत नाही. तो मस्त पडून सिगारेट फूकत आणि हसत आहे. दुसरा एक मित्र त्याचा व्हिडीओ शूट करत आहे.
lowslow.indonesia इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत. लोक यावर चकित झाले असून संतापही व्यक्त करत आहेत. हे दृश्य एवढं वाईट आहे ती एखाद्याचा यात गुदमरुन जीवही जाऊ शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. सोशल मीडियावर असे विचित्र, भयानक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकरीही अशा व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्ट होतात.