व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 12 एप्रिल : अनेकदा तरुण तरुणी रस्त्यावर, दुकानात, हॉटेलमध्ये भांडताना दिसततात. याचे बरेच व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी कधी तर ही भांडणं एवढी वाढतात की दोघं एकमेकांवर हातही उचलताना दिसतात. अशा अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच सध्या यामध्ये आणखी एका घटनेची भर पडलीये. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक तरुण चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेताना दिसला. तरुणाने मुलीला खूप कमकुवत समजून तिच्याशी पंगा घेतला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण तरुणीसोबत एका काउंटरवर उभा आहे. अचानक काही कारणावरून तरुणाने तरुणीला धक्काबुक्की केली. मुलीने लगेच त्याला धडा शिकवला आणि फाईट बॅक दिली. मुलीच्या फटक्यात तो जमीनीवर कोसळला.
७ सेकंदांचा हा व्हिडीओ @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्स सतत मुलीचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, कधी समोरच्या व्यक्तीला कमी समजून नये, असं या व्हिडीओवरुन पहायला मिळतंय. तुमच्या समोरच्या व्यक्तीची ताकद, चातुर्य आणि इतर वैशिष्ट्यांचा तुम्ही कधीही अंदाज लावू शकत नाही. तुम्ही स्त्रियांना कमकुवतही समजू शकत नाही. हा व्हिडीओ काही वेळातच इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला.