JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्री-वेडिंग फोटोशूटसाठी तरुण तरुणीचा धोकादायक स्टंट, Video पाहून अंगावर येईल काटा

प्री-वेडिंग फोटोशूटसाठी तरुण तरुणीचा धोकादायक स्टंट, Video पाहून अंगावर येईल काटा

सध्या सर्वत्र लगीन घाई चालू आहे. अशात मग प्री-वेडिंग शूटचा धुमाकुळ सध्या पाहायला मिळत आहे. खेडेगाव असो की पंचतारांकित शहर प्रीवेडिंग शुटींगचे वेड सर्वांनाच असतं.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मार्च : सध्या सर्वत्र लगीन घाई चालू आहे. अशात मग प्री-वेडिंग शूटचा धुमाकुळ सध्या पाहायला मिळत आहे. खेडेगाव असो की पंचतारांकित शहर प्रीवेडिंग शुटींगचे वेड सर्वांनाच असतं. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या ठिकाणी फोटोशूट करणाऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे. काहीही झालं तरी चालेल पण प्री वेडिंग शुट निट व्हायला हवं असंच सर्वांना वाटत आहे. यासाठी लोक वेगवेगळे स्टंटदेखील करायला कमी करत नाहीत. असाच एक प्री-वेडिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आपल्या लग्नाचा प्री वेडिंग शूट हा हटके करण्याचा मानस सध्या अनेक जोडप्यांचा दिसतो. मग फोटोग्राफर भन्नाट कल्पकता दाखवत फोटोशूट करतो. अशात सध्या एक वेडिंग शूटचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्या व्हिडिओला नेटकरी पसंती देत आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत माहिती नसली तरी एखाद्या साऊथच्या सिनेमातील सिनप्रमाणेच हा व्हिडीओ शूट झाल्याचं पहायला मिळतंय.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तरुण तरुणी नवविवाहीत जोडप्याच्या वेशात एका गाडीवर बसलेले आहे. त्यांना एका क्रेनच्या सहाय्याने उचलून घेतले जात आहे. समोरच्या बाजूला एक स्कॅर्पिओ दिसत असून नवरदेव गाडी चालवताना दिसत आहे. अशात पहिले पाहिलं तर हा व्हिडीओ अगदी खरा सीनसारखा वाटल्या शिवाय राहात नाही. काहीजण या व्हिडीओला भोजपुरी चित्रपटातील सिन म्हणून कमेंट करत आहे तर काहीजण साऊथच्या चित्रपटातील सीन असं सांगत आहेत.

मोटारसाइकले अगदी भन्नाट पद्धतीने स्कॅरपिओ गाडीला पार केल्याचं दिसतंय. हा 13 सेकंदाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेक प्री वेडिंग शुट पाहीले असतील पण अशाप्रकारचे सर्वांनाच विचारात टाकणारा शूट पाहून नेटकरी अचंबित होत आहेत. सध्या 9 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहीला आहे. @bestofallll नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या