वजन कमी करण्याच्या तरुणीचा गेला जीव
नवी दिल्ली, 16 जून : आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या शरिराला घेऊन खूप चिंतेत असतो. खास करुन वजनावरुन. वजन थोडसं जरी वाढलं तरी लोक त्यावर विविध उपाय करताना दिसतात. विशेष करुन मुली आपल्या वजनाला घेऊन निरनिराळ्या गोष्टी ट्राय करताना दिसतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, जीम, डाएट, औषधे असे नाविध प्रकार आजमवतात. मात्र कधी याचा उलटा परिणामही दिसून येतो. वजन कमी करण्याच्या नादात उपाय कधी उलटतील काही सांगू शकत नाही. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये एका तरुणीने वजन कमी करण्याच्या नादात आपला जीव गमावला. वजन कमी करण्याच्या नादात एका 21 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना समोर आलीये. तरुणीने 90 किलो वजन कमी करण्याचा निश्चय केला होता. यासाठी तिने खाणंपिणंही कमी केलं. ती रिकाम्या पोटी वर्कआऊट करायची. यामुळे तिची तब्बेत बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहचेपर्यंत तिला जीव गमवावा लगाला. शांघाय मॉर्निंग न्युजने याबाबत वृत्त दिलं आहे.
वजन कमी करण्याच्या नादात जीव गमावलेली व्यक्ती चिनी सोशल मीडियावर कुइहुआ नावाने लोकप्रिय होती. तिच्या पालकांना खुद्द याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आमची मुलगी आता राहिली नाही. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप धन्यवाद. [gallery size=“full” ids=“904791”] दरम्यान, आजकाल लोक सोशल मीडियाच्या प्रभावामुळे, चांगले दिसण्याच्या चक्करमध्ये काहीही करतात. यामध्ये ते त्याच्या होणाऱ्या वाईट परिणामांकडे लक्ष न देता लवकरात लवकर परिणाम दिसण्याकडे लक्ष देतात. ज्यामुळे त्यांना गंभीर गोष्टींना सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावर वजन कमी करण्याच्या नादात, सुंदर दिसण्याच्या नादात अनेक विचित्र गोष्टी करताना लोकांच्या घटना समोर आल्या आहेत. ज्याचा आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोक करतात मग त्यांच्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं.