JOIN US
मराठी बातम्या / Viral / टेंशन न घेता साधली संधी; लग्नाच्या वरातीमुळे ट्राफिकमध्ये अडकलेल्या तरुणाने काय केलं तुम्हीच पाहा

टेंशन न घेता साधली संधी; लग्नाच्या वरातीमुळे ट्राफिकमध्ये अडकलेल्या तरुणाने काय केलं तुम्हीच पाहा

लग्न समारंभात अनेक विचित्र, धक्कादायक, मजेशीर गोष्टी घडत असतात. या समारंभातील फोटो व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : लग्न समारंभात अनेक विचित्र, धक्कादायक, मजेशीर गोष्टी घडत असतात. या समारंभातील फोटो व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका लग्नाच्या मिरवणुकीचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘बेगानी शादी मधील अब्दुल्ला दीवाना’ ही म्हण सर्वांनी ऐकली असेलच. या म्हणीप्रमाणे एक प्रकार समोर आला आहे. जे पाहून युजर्सना ही म्हण म्हणण्यास भाग पाडले आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लग्नाच्या मिरवणुकीमुळे ट्रॅफिक जॅम झाल्याचं दिसत आहे. या ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एका तरुणाने तिथेच डीजेच्या तालावर डान्स करायला सुरुवात केली. त्याचा डान्स पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ Ghumakkad_Prayagi नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर साऱ्या कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या मजेशीर कमेंट येत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं असून नेटकरी व्हिडीओला चांगली पसंती देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या