व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 20 मार्च : प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काहीतरी हटके, वेगळ्या गोष्टी करताना लोक दिसून येतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच यामध्ये समाविष्ठ असतात. विशेषतः तरुणांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचं क्रेझ मोठ्या प्रमाणात पहायला मिळतं. यासाठी ते जीवाची बाजी लावायलाही मागे पुढे पाहत नाही. आत्तापर्यंत तरुणाईचे अनेक धोकादायक स्टंट समोर आले आहेत जे पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. अशातच आणखी एका तरुणाचा स्टंट व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गावातील असल्याचे दिसत आहे. जिथे काही मुले उभी राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतायेत. दरम्यान, एक अतिआत्मविश्वास असलेला मुलगा छतावरून उलटी उडी घेतो. मुलगा खाली येईपर्यंत सर्व काही सुरळीत चालल्याचं दिसत आहे पण तो त्याचे लँडिंग नीट करत नाही आणि तो खाली कोसळतो. त्याला खूप दुखापत झालेलीही जाणवत आहे. शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या मित्राने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर aapka_dance नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 53 लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले असून कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अनेकजण तरुणाईंच्या वाढत्या स्टंटबाजीवर संताप व्यक्त करत आहेत. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला.
स्टंट करणे सोपे नाही. यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागते. मग कुठेतरी त्या पातळीचा स्टंट करता येतो. जे दाखवून तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता, पण या वेगवान जगात तरुणांनी स्टंटबाजीला मुलांचा खेळ समजला आहे. त्यामुळे स्टंट करताना अनेकवेळा दुखापतही होते. त्यामुळेच स्टंट करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असते, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, असे सांगितले जाते.