JOIN US
मराठी बातम्या / Viral / सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मोडली मान; कुस्तीपटूचा मैदानातच मृत्यू, घटनेचा धक्कादायक VIDEO

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मोडली मान; कुस्तीपटूचा मैदानातच मृत्यू, घटनेचा धक्कादायक VIDEO

ठाकूरद्वारातील फरीदनगर गावात झालेली कुस्ती एका कुस्तीपटूसाठी मृत्यूचा (Wrestler died in Murabadab) आखाडा बनली. या कुस्तीपटूची प्रतिस्पर्धकानं मान मोडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुरादाबाद 09 सप्टेंबर : ठाकूरद्वारातील फरीदनगर गावात झालेली कुस्ती एका कुस्तीपटूसाठी मृत्यूचा (Wrestler died in Moradabad) आखाडा बनली. या कुस्तीपटूची प्रतिस्पर्धकानं मान मोडली. इतकंच नाही तर मदत करण्याऐवजी प्रतिस्पर्धी पैलवानानं दोन -तीन वेळा या युवकाची मान हालवून पाहिली आणि मग तो मागे हटला. लोक टाळ्या वाजवत राहिले. यादरम्यान आयोजक आणि रेफरी घटनास्थळी पोहोचले. मसाज करून मान जोडण्याचा प्रयत्न केला, पण जखमी पैलवानाचा जीव वाचवता आला नाही. गावातील पंचायतीनंतर 60 हजार रुपयांची नुकसान भरपाई सुनावत हे प्रकरण शांत करण्यात आलं. सहा दिवस ही घटना गुपित ठेवण्यात आली. मात्र, व्हिडिओ व्हायरल (Shocking Video of Dangal) झाल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलीस अजूनही या घटनेची माहिती देण्यास नकार देत आहेत. विचित्र चोर! पोलिसांनी छापा मारला तेव्हा सापडला महिलांच्या अंतर्वस्त्रांचा ढीग 2 सप्टेंबर रोजी मुरादाबादच्या ठाकूरद्वारातील फरीदनगरमध्ये दंगल आयोजित करण्यात आली होती. गावकऱ्यांच्या मते, नौमी मेळ्यात परवानगीशिवाय रिंगण सजवण्यात आले होते. यामध्ये काशीपूर, उत्तराखंड येथील कुस्तीपटू महेश कुमार देखील सहभागी होण्यासाठी आलेला. या दरम्यान महेशचा फरीदनगरचा पैलवान साजिद अन्सारीसोबत कुस्ती सामना झाला. असा आरोप आहे, की कुस्तीदरम्यान साजिदने महेशला उचलले आणि खाली आदळले तेव्हा महेश मानेवर आदळला. यामुळे महेशची मान तुटली. तो जमिनीवर कोसळला आणि तडफडू लागला. दुसरीकडे, कुस्ती पाहणारे लोक साजिद पैलवानाच्या विजयासाठी टाळ्या वाजवत होते. काही काळानंतर महेशचा रिंगणातच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

पाकिस्तानातील किराणा दुकानात Money Heist चा ‘प्रोफेसर’, पुढील चोरीचा प्लॅन? यानंतर आयोजकांनी जेव्हा महेशला उचललं तेव्हा त्याची मान एका बाजूला लटकलेली होती. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. कोणीही त्याला उपचारासाठी रुग्णालयातही घेऊन गेलं नाही. यानंतर काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पोलिसांनाही या घटनेची माहिती देणं तेथील लोकांना महत्त्वाचं वाटलं नाही. बुधवारी पैलवानाच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटना समोर आली. एसपी देहात विद्या सागर मिश्रा यांनी सांगितलं, की पोलिसांना कोणीही पैलवानाच्या मृत्यूची माहिती दिलेली नाही. इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओही आम्ही पाहिला नाही. तक्रार आल्यानंतर तपास करून कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या