प्रतिकात्मक व्हिडीओ
मुंबई 04 जानेवारी : सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडीओ आपल्यासमोर असतात, जे आपल्याला हसायला भाग पाडतात. तर काही व्हिजीओ हे अगदी अंगावर काटा आणणारे असतात. येथे आपण अनेक अपघातांचे व्हिडीओ देखील पाहिले असेल. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ जोरदार ट्रेंड होत आहे. हा अपघाताचा व्हिडीओ फारच धोकादायक आणि विचित्र आहे. जो कोणाच्याही हृदयाचे ठोके चुकवू शकतो. हे ही पाहा : Video : ‘यमराज सुट्टीवर होता वाटतं?’’, झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एमजी रोडवरील हा अपघात आहे, हा अपघात जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. ज्याने सर्वांनाच हादरवले आहे. एक महिला ट्रकच्या टायरखाली आल्याचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. परंतु या महिलेचं नशीब इतकं चांगलं होतं की तिचा जीव थोडक्यात बचावला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने परिस्थीतीचे भान राखल्यामुळे हे शक्य झालं आहे.
एक महिला भरदुपारी एमजी रोडवरुन जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हाच तिचा तोल गेला आणि ट्रकच्या चाकाखाली आली. ही घटना घडल्यानंतर तेथेच उभ्या असलेल्या युवकाने तिला मागे खेचले, ज्यामुळे तिचे प्राण वाचले. हे ही पाहा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक या युवकाचं नाव युवराज रौनक राजपूत असल्याचं सांगितलं जातं. या तरुणाच्या धाडसामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. लोकांनी या तरुणाचं भरभरुन कैतुक केलं आणि त्याच्या या कामाला सलाम देखील केलं आहे. या महिलेनं ट्रकला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्ही गाडी चालवताना अशी चुक करु नका आणि ट्राफिक नियमांचं पालन करा, यामुळे फायदा तुमचाच आहे.