प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली 01 जानेवारी : अनेक महिलांसाठी आई होणं (Motherhood) हा अतिशय आनंदाचा आणि आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. बाळाच्या जन्मानंतर आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. मात्र, अनेकदा हा आनंद दुप्पट होतो. जेव्हा एखादी महिला जुळ्या बाळांना जन्म देते. सध्या बाळाच्या जन्माचं एक असंच अतिशय अनोखं प्रकरण समोर आलं आहे. यात एक महिला, दोन गर्भाशय आणि दोन गर्भाशयातून जन्मलेली दोन जुळी बाळं (Woman with 2 Uterus give Birth to Twins Baby) हे चर्चेचा विषय ठरत आहेत. पत्नीला परपुरुषासोबत संबंध ठेवताना पाहून पतीला झाला आनंद; केली विचित्र मागणी इस्रायलच्या तेल अवीवमध्ये 31 वर्षाच्या एले लाडोविच नावाच्या महिलेनं दोन वेगवेगळ्या गर्भाशयातून जुळ्या बाळांना जन्म दिला. तिची प्रसूती सुखरूपरित्या झाली असून बाळंही तंदुरुस्त आहेत. विशेष बाब म्हणजे जुळी असूनही ही दोन्ही बाळं जन्मानंतरच एकमेकांना भेटली. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं कारण आहे त्यांच्या आईला असलेली दोन वेगवेगळी गर्भाशयं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अजब प्रकरण 5 कोटी गर्भधारणेच्या प्रकरणांमध्ये एखाद्या वेळेसच होण्याची शक्यता असते. लाडोविच ही डिडेलफिस गर्भाशयासोबत जन्मली होती. म्हणजेच तिचं गर्भाशय दोन भागात विभागलेलं होतं. याच कारणामुळे तिने एकाच वेळी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र ही दोन्ही बाळं एकाच आईच्या पोटात असूनही दोन वेगवेगळ्या गर्भाशयात वाढली. हे अनोखं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहेत.