JOIN US
मराठी बातम्या / Viral / टॅटूच्या नादात तरुणीच्या हाताची अक्षरशः वाट लागली; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

टॅटूच्या नादात तरुणीच्या हाताची अक्षरशः वाट लागली; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

एक तरुणी लेटाटूर नावाच्या एका टॅटू आर्टिस्टकडे (Tattoo artist) टॅटू गोंदवण्यासाठी गेली होती. तिने आर्टिस्टला सांगितलं की माझ्या हातावर असा टॅटू बनव, जो पाहून वाटेल की मी हातमोजेच घातलेले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 मार्च : आजकाल टॅटूचं क्रेज मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लहान मुलं असो किंवा तरुण, प्रत्येकाला टॅटू बनवण्याचं जणू वेडच लागलं आहे. लोक शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर टॅटू गोंदवून घेतात. मात्र एका तरुणीने तर हद्दच पार केली. तिने आपल्या पूर्ण हातावर काळ्या रंगाचा टॅटू बनवून घेतला आणि जेव्हा तो पूर्ण झाला तेव्हा पाहून असं वाटलं, जणू तो टॅटू नसून काळ्या रंगाचे हातमोजे आहेत (Weird Tattoo on Hand). GF चा ड्रेस पाहताच आऊट ऑफ कंट्रोल झाला; BF ने केलेल्या प्रतापाचा VIDEO डेली स्टारच्या वृत्तानुसार, फ्रान्समधील एक तरुणी केयनमधील लेटाटूर नावाच्या एका टॅटू आर्टिस्टकडे (Tattoo artist) टॅटू गोंदवण्यासाठी गेली होती. तिने आर्टिस्टला सांगितलं की माझ्या हातावर असा टॅटू बनव, जो पाहून वाटेल की मी हातमोजेच घातलेले आहेत. तिने आपल्या डाव्या हातावर टॅटू गोंदवून घेतला. हा टॅटू गोंदवतानाच्या प्रक्रियेचा व्हिडिओ टॅटू आर्टिस्टने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आर्टिस्ट या तरुणीच्या पूर्ण हातावर काळा रंग पसरवताना दिसत आहे. तो टॅटू निडल संपूर्ण हातावर फिरवत आहे. यादरम्यान कदाचित वेदनेमुळे तरुणी भिंतीकडे आपला चेहरा करून बसली आहे.

पाहता पाहता हा आर्टिस्ट संपूर्ण हात काळ्या रंगाने भरवतो. यानंतर तो हाताच्या मागच्या बाजूला त्रिकोणाकार बनवतो. हे पाहून खरंच असं वाटतं की हा टॅटू नसून हातमोजेच आहेत. उडता उडता एका पक्ष्याचा दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला; आकाशातील शिकारीचा थरारक VIDEO हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 4 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर 10 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. यानंतर टॅटू आर्टिस्टने दुसरा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो टॅटूला फायनल टच दिल्यानंतर हात स्वच्छ करताना दिसतो. यानंतर टॅटू आणखीच आकर्षक दिसू लागतो. या व्हिडिओलाही आतापर्यंत 22 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, की लोक अशाप्रकारच्या डिझाईन शरीरावर का बनवत असतील. अनेकांनी तरुणीला सवाल केला की स्वतःचा पूर्ण हात काळा करून घेण्याची इच्छा का झाली?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या