JOIN US
मराठी बातम्या / Viral / लसीकरण पथक दिसताच घर सोडून पळाली महिला; शेतात पकडून जबरदस्तीने दिली लस, ढसाढसा रडतानाचा VIDEO

लसीकरण पथक दिसताच घर सोडून पळाली महिला; शेतात पकडून जबरदस्तीने दिली लस, ढसाढसा रडतानाचा VIDEO

Woman Ran Away after Seeing Health Workers : गुरुवारी जेव्हा जिल्हा प्रशासनाची टीम एका महिलेच्या घरी गेली. यानंतर ही महिला पळून थेट शेतात गेली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 14 डिसेंबर : कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) लोकांना जागरूक करण्याकरता अभियान चालवलं जात आहे. विविध माध्यमांमधून सातत्याने हे काम केलं जात आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये अजूनही अनेक लोक लसीबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवत असल्याचं चित्र आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यातही नुकतंच असंच चित्र पाहायला मिळालं. जिल्ह्यातील सिकंदरा परिसरातील लछुआड गावातील एक महिला लसीच्या भीतीने घरातून पळून थेट शेतामध्ये गेली (Woman Ran Away after Seeing Vaccination Team). VIDEO - नवरीबाईसोबत पंगा नवरदेवाच्या मित्रांना पडला भारी; तिने चांगलीच खोड मोडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला (Shocking Video Viral) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाची टीम गावोगावी जात लोकांना लस घेण्यास सांगत आहे. गुरुवारी जेव्हा जिल्हा प्रशासनाची टीम एका महिलेच्या घरी गेली. यानंतर ही महिला पळून थेट शेतात गेली. गर्दीतून तिला कोणाचातरी आवाज आला की लसीकरण करण्यासाठी लोक आले आहेत, बाहेर या. हे ऐकताच महिलेला वाटलं की आता आपण वाचणार नाही आणि लस देणारे लोक आपल्याला पकडतील. यामुळे महिला घरातून पळ काढत शेतात पोहोचली. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतात जात महिलेला चार-पाच लोकांच्या मदतीने पकडून लस दिली.

लस दिली जात असताना ही महिला मोठमोठ्याने ओरडू आणि रडू लागली. महिलेची ओळख सरीता देवी अशी समोर आली आहे. कोरोना लसीला घाबरून शेतात पळालेली महिला आणि शेतातच महिलेला पकडून लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मी़डियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दोरीच्या सहाय्याने चिखलाने भरलेला खड्डा पार करायला गेली अन्…; मजेशीर VIDEO

याप्रकरणी आरोग्य जिल्हा आरोग्य व्यवस्थापक सुधांशू कुमार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितले. मात्र याचा तपास सुरू असून, कोरोना लसीबाबत जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. काही कमतरता असल्यास ती लवकरच दूर केली जाईल, असंही ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या