JOIN US
मराठी बातम्या / Viral / मोठ्या हुशारीने उडवली Gold ring, चोरट्या महिलेची हेराफेरी कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

मोठ्या हुशारीने उडवली Gold ring, चोरट्या महिलेची हेराफेरी कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

संधी साधून महिलेने सोन्याच्या अंगठीवर मारला डल्ला आणि पुढे जे केलं ते पाहून हैराण व्हाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 डिसेंबर : चोर हे बरोबर संधी साधून चोरी करतात आणि तिथून लगेच फरार होतात. पण एका चोर महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यात तिने इतक्या हुशारीने चोरी केली आहे की समोर असलेल्या कुणालाही समजलं नाही. महत्त्वाचं म्हणजे जर तिची हेराफेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नसती तर कदाचित इतक्या लवकर तिची चोरी (Chori video) पकडलीही गेली नसती. एका महिलेने एका ज्वेलर्सच्या दुकानात (Jewellery Shop)  चोरी केली आहे. तिने इतक्या चलाखीने आणि शांतपणे चोरी केली की पाहूनच थक्क व्हाल. ही महिला दागिने खरेदी करण्याच्या बाहण्याने ज्वेलर्स दुकानात गेली. तिथं तिने संधी सांधून सोन्याच्या अंगठीवर डल्ला मारला आहे.

संबंधित बातम्या

पण महिलेचा हा सर्व प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @StunnedVideo नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा -  एअरपोर्टवर महिलेनं केलं असं कृत्य की वळून वळून पाहू लागले लोक, झाली अटक व्हिडीओत पाहू शकता महिलेने काही अंगठी दाखवायला सांगितल्या. थोडा वेळ महिला विक्रेत्यासोबत बोलते. त्यानंतर दुसरी डिझाइन दाखवून त्याचं लक्ष विचलित करते. जसा तो विक्रेता पाठ फिरवतो तशी ही महिला आपल्यासमोर असलेल्या बॉक्समधील अंगठी घेते आणि ती हळूच आपल्या हातात ठेवते. ती यावरच थांबत नाही तर पुढे ती आपल्या हातातली नकली अंगठी काढून बॉक्समध्ये त्या सोन्याच्या अंगठीच्या जागी ठेवते. जेणेकरून दुकानदाराला संशय येऊ नये. हे वाचा -  चालता-बोलताही जाऊ शकतो जीव? रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा VIDEO पाहून हादराल! मॅडमची हेराफेरी, सोन्याची अंगठी उडवली असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे.तुम्ही हातांची सफाई पाहिली का, अशा लोकांपासून सावध राहायला हवं, अशा बऱ्याच प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या