प्रतीकात्मक फोटो
बँकॉक, 21 जुलै : जास्त वजन आरोग्यासाठी चांगलं नाहीच. प्रत्येकाला आपण स्लिम, फिट राहावं असं वाटतं. यासाठी लोक काय काय प्रयत्न करतात. एक्सरसाइझ, डायटिंग आणि बरंच काही करतात. इतके प्रयत्न करूनही वजन कमी झालं नाही तर मग डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. अशीच एक महिला जिने सर्व प्रयत्न करूनही तिचं वजन कमी झालं नाही. शेवटी ती लठ्ठपणा कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली. पण तिथं तिच्या पोटात जे सापडलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. थायलंडमधील ही महिला. जी वजन जास्त असल्याने ते कमी कऱण्यासाठी उपचार व्हावेत म्हणून डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला पाहताच लठ्ठपणाची समस्या आहे, दुसरं काहीच नाही, असं वाटलं. पण नंतर तिच्या तपासण्या करण्यात आल्या. जे रिपोर्ट आले ते पाहून डॉक्टरही शॉक झाले. थोडसं खरचटलं म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर मात्र जीवावर बेतलं, तरुणासोबत धक्कादायक प्रकार डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्युंग कान हॉस्पिटलच्या डॉक्टरने फेसबुकवर या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, वजन जास्त असल्याने एक महिला माझ्याकडे आली होती. सुरुवातीला वाटलं ती फक्त लठ्ठ आहे आणि तिला काही त्रास नाही. पण ती महिला मान्य करायला तयार नव्हती. आमच्याकडे अनेक प्रकारच्या चाचण्या झाल्या. रिपोर्ट आल्यावर आश्चर्य वाटलं. ती महिला लठ्ठ नव्हती तर तिच्या पोटात गाठ होती. तपासणीत महिलेच्या अंडाशयात 9.4 इंच x 13.4 इंच आकाराचे सिस्ट तयार झालं होतं. जे पाण्याने भरलं होतं. त्यामुळे त्याचं वजन 9 किलोपेक्षा जास्त झालं होतं. गाठ इतकी मोठी इतकी की पूर्ण पोट व्यापलं होतं. इतर अवयव त्याखाली दबले गेले होते. जर महिलेची तपासणी करून याचं वेळीच निदान झालं नसतं तर तिला अनेक समस्या उद्भवल्या असत्या. अगदी कॅन्सरही झाला असता. व्यक्ती रोज 10 लिटर पाणी प्यायची, डॉक्टरांकडे जाताच धक्कादायक आजार आला समोर रिपोर्टनुसार हा डिम्बग्रंथी अल्सर होता जो अंडाशयावर तयार झाला होता. न्यूजवीकच्या अहवालानुसार, मासिक पाळीमुळे सुमारे 8% महिलांमध्ये डिम्बग्रंथी सिस्ट विकसित होतात. कधी कधी शस्त्रक्रियाही करावी लागते. पण सामान्यपणे हे चेरी किंवा आंब्याच्या आकाराचे असतात. इतके मोठे कधीच नाही. त्यामुळे महिलेची इतकी मोठी गाठ पाहून डॉक्टरही हैराण झाले. या महिलेच्याबाबतीत असं का झालं, हा मेडिकल सायन्ससाठी संशोधनाचा विषय ठरू शकतो.