प्रतीकात्मक फोटो
रायपूर 03 फेब्रुवारी : ग्रामीण भागांमध्ये लग्नात अनेक अडचणी येतात. अनेकदा तर लग्न ठरल्यानंतरही अगदी साध्या कारणांवरुन लग्न मोडलं जातं. अशात जर एखाद्या नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधी बाळाला जन्म दिला (Bride Gave Birth to Baby Before 1 day of Marriage), तर काय होईल? छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातूनही एक असंच प्रकरण समोर आलं आहे. नवरी लग्नाच्या एक दिवस आधी आई बनवल्यावर मुलाकडच्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई लाईव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार, छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील बडेराजपूर येथे आदिवासी समाजातील लोक राहतात. इथे राहणाऱ्या शिवबत्ती हिचा विवाह 31 जानेवारी रोजी ओडिशाच्या चंदन नेतामसोबत ठरला होता. लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 जानेवारीला शिवबत्तीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. मात्र, याचदरम्यान तिच्या पोटात दुखू लागलं. काहीच वेळात समजलं की तिने एका बाळाला जन्म दिला आहे. पुढे जे घडलं ते आणखी आश्चर्यकारक होतं. आता तुम्ही विचार करत असाल की लग्नाशिवाय मूल झालं तर वातावरण गंभीर झालं असेल. मात्र असं काहीच घडलं नाही, उलट लग्नासोबतच मूल झाल्याच्या दुहेरी आनंदाने लोकांमध्ये अधिकच उत्साह संचारला.
हे सगळं कसं झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याबाबत नवरीच्या आईने सांगितलं, की आदिवासी समाजात पैठू प्रथा आहे. पैठू प्रथा म्हणजेच एकप्रकारचं लिव्ह इन रिलेशनशिपही म्हणू शकता. या प्रथेमध्ये मुलगी आपल्या कुटुंबीयांना माहिती देऊन आणि त्यांच्या परवानगीने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्नाच्या आधीच राहायला सुरुवात करते. काही वेळ सोबत घालवल्यानंतर म्हणजेच पैठू झाल्यानंतर दोघांचे कुटुंबीय त्यांचं लग्न लावून देतात. या प्रथेतूनच शिवबत्ती 2021 मध्ये आपल्या आवडीचा मुलगा चंदन याच्या घरी पैठू गेली होती. याच कारणामुळे लग्नाच्या आधीच तिने बाळाला जन्म दिला.