JOIN US
मराठी बातम्या / Viral / यूनिक दिसावं म्हणून मानेवर गोंदवला टॅटू, काहीच तासात तरुणीची झाली अशी अवस्था

यूनिक दिसावं म्हणून मानेवर गोंदवला टॅटू, काहीच तासात तरुणीची झाली अशी अवस्था

तिने मानेवर लाल रंगाचे सॅटिन रिबन दर्शविणारा एक टॅटू काढला होता, परंतु बनवल्यानंतर तिला काही तास खूप त्रास सहन करावा लागला.

जाहिरात

महिलेनं मानेवर काढला टॅटू (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 मे : काहींना टॅटू बनवायला खूप आवडतं. शरीराच्या विविध अवयवांवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू लोक बनवून घेतात. पण टॅटू बनवून घेताना योग्य काळजी घेणं आवश्यक असतं, नाहीतर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. असंच एक प्रकरण समोर आलंय, ज्यामध्ये एका महिलेला टॅटू बनवून घेणं चांगलंच महागात पडलंय. टॅटू बनवल्यानंतर तिची अशी अवस्था होईल, असा विचार त्या महिलेने कधी स्वप्नातही केला नसेल. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

टिकटॉकर @alienjarz ने तिच्या मानेवर टॅटू काढून घेतला. तिने मानेवर लाल रंगाचे सॅटिन रिबन दर्शविणारा एक टॅटू काढला होता, परंतु बनवल्यानंतर तिला काही तास खूप त्रास सहन करावा लागला. @alienjarz ने तिच्या या टॅटूबद्दल अनेक व्हिडिओ शेअर केले, ज्यामध्ये तिने सांगितलं की, हा टॅटू वाईट दिसत नव्हता, पण ते बनवून घेण्याचा तिचा अनुभव भयानक होता. साधारणपणे टॅटू काढण्यापूर्वी त्या भागाची त्वचा व्यवस्थित स्वच्छ केली जाते जेणेकरून कोणतेही बॅक्टेरिया वगैरे राहणार नाहीत. @alienjarz म्हणाली, ‘हा टॅटू बनवण्यापूर्वी टॅटू मेकरने तिची त्वचा स्वच्छ केली नाही, त्याने इतरही अनेक गोष्टी केल्या, ज्या पाहून कदाचित मी हा टॅटू बनवायला नको होता.’

यानंतर जेव्हा ते लोक माझा टॅटू बनवत होते तेव्हा टॅटू बनवणाऱ्याने हिरव्या रंगाचा साबण वापरला नाही. हे पाहून मला खूप विचित्र वाटलं, कारण या आधीही मी अनेक टॅटू बनवले आहेत आणि त्या दुकानात मी एकटीच अशी व्यक्ती होते, जिच्या शरीरावर अनेक टॅटू होते. टिकटॉक युजर @alienjarz च्या मते, टॅटू मेकरने टॅटू काढल्यानंतर त्याची काळजी घेण्याबाबत फारसा सल्लाही दिला नाही. या अनुभवानंतर टॅटू स्टुडिओबद्दल चौकशी केल्यावर टिकटॉक युजर @alienjarz ला कळालं की ती या स्टुडिओमध्ये ज्या प्रकारचा टॅटू बनवायला गेली होती, तसा टॅटू बनवण्याचा कोणतंही लायसन्स त्यांच्याकडे नव्हतं. तसेच टॅटू बनवणाऱ्यानेही यापूर्वी असा कोणताही टॅटू काढला नव्हता. पण त्यांनी याबाबत कोणतीही माहिती शेअर केली नव्हती. यानंतर @alienjarz ने दुसर्‍या स्टुडिओमधून तिचा टॅटू दुरुस्त करून घेतला आणि एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तिने तिचा नवीन टॅटू परफेक्ट असल्याची माहिती दिली. तसेच तो टॅटू खूप जाड आणि ब्राईट लाल रंगाचा असून तो जुन्या टॅटूपेक्षा खूपच चांगला आहे, असंही सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या