JOIN US
मराठी बातम्या / Viral / महिलेचा विचित्र आजार चिमुकल्यांसाठी ठरला 'संजीवनी'; हजारो बाळांचा वाचला जीव

महिलेचा विचित्र आजार चिमुकल्यांसाठी ठरला 'संजीवनी'; हजारो बाळांचा वाचला जीव

एका महिलेला असा एक विचित्र आजार झाला आहे, ज्यामुळे हजारो बाळांचा जीव वाचला आहे.

जाहिरात

हजारो बाळांना वाचवणारी सुपरमॉम. (फोटो - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 16 जुलै : आजार कोणताही असो, या आजाराने आजवर कित्येकांचे जीवच घेतले आहेत. पण कधी कोणत्या आजाराने कुणाचा जीव वाचवल्याचं ऐकलं आहे का? एका महिलेला असा एक विचित्र आजार झाला आहे, ज्यामुळे हजारो बाळांचा जीव वाचला आहे. महिलेचा आजार चिमुकल्यांसाठी संजीवनी ठरतो आहे. या महिलेची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे. अमेरिकेत राहणारी  एलिझाबेथ अँडरसन. जी स्वतः दोन मुलांची आई आहे. शिवाय तिने कित्येक नवजात बाळांचा जीव वाचवला आहे आणि अजूनही ती वाचवत आहे. ते म्हणजे ब्रेस्टमिल्क दान करून. आईचे दूध मुलांसाठी अमृत मानलं जातं. जन्मानंतर 6 महिने मुलांना आईचं दूध द्यावं, असं डॉक्टर सांगतात. कारण त्यात पोषक तत्वांचा मुबलक प्रमाणात समावेश असतो, जो त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाचा असतो.  आपल्याला दूध जास्त यावं यासाठी प्रत्येक आई सर्व प्रकारचे प्रयत्न करते. एलिझाबेथ हिला इतकं दूध येतं की ती इतर मुलांनाही आपलं दूध देते. गिनीज बुकनुसार, 20 फेब्रुवारी 2015 ते 20 जून 2018 पर्यंत, तिने 1600 लीटर ब्रेस्ट मिल्क एका मिल्क बँकेला दान केलं आहे. कोणत्याही महिलेने इतक्या प्रमाणात ब्रेस्टमिल्क दान करण्याचा हा विक्रम आहे. अजब प्रकरण! दर 6 वर्षांनी याच्यावर कोसळते वीज; मृत्यूनंतरही पिच्छा सोडला नाही एलिझाबेथ  म्हणाली, पूर्वी ती बहुतेक दूध फेकून देत असे. पण एके दिवशी तिला वाटलं की त्याचा योग्य वापर केला तर जगात अशी अनेक मुले आहेत ज्यांचे प्राण वाचवू शकतील.  जेव्हा तिला दुसरी मुलगी झाली तेव्हा आठवडाभरानंतर तिनं तिचं दूध दान करण्यास सुरुवात केली. ती पंपातून दररोज 6 लीटर दूध काढते. ते एका बाटलीत पॅक करून दूध बँकेला दान करते.

संबंधित बातम्या

2015 ते 2018 दरम्यान मी एका मिल्क बँकेला दान केलेल्या दुधाचं हे खातं आहे. याशिवाय मी सर्व मुलांसाठी दूध उपलब्ध करून दिलं आहे. मी गेल्या 9 वर्षात 10350 लीटर दूध दान केलं आहे. मी फक्त अशा लोकांनाच दान करते ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे, असं ती म्हणाली. ऑपरेशन होतंय म्हणून घाबरू नका; सर्जरीआधी जरूर विचारा हे 3 प्रश्न, आहेत तुमच्या फायद्याचे आता तिला इतकं ब्रेस्टमिल्क येतं कसं. तर तिला हायपरलॅक्टेशन सिंड्रोम आहे. ही अशी स्थिती आहे, ज्यामुळे आईचे भरपूर दूध तयार होते आणि एका वेळी ओव्हरफ्लोची स्थिती निर्माण होते. एलिझाबेथ म्हणाल्या, माझे शरीर प्रोलॅक्टिन नावाचे संप्रेरक भरपूर बनवते आणि त्यामुळे दुधाची निर्मिती वाढते. पण हे ती इतके आईचे दूध तयार करण्यास सक्षम का हे एकमेव कारण नाही. जर तुम्हाला पंप कसा करायचा हे माहित असेल तर तुम्ही भरपूर दूध काढू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या