JOIN US
मराठी बातम्या / Viral / ऑनलाईन डेटिंग तरुणाला पडलं महागात; महिलेनं 8 लाख रुपये लुटले, मग चाकू गळ्यावर ठेवला अन्...

ऑनलाईन डेटिंग तरुणाला पडलं महागात; महिलेनं 8 लाख रुपये लुटले, मग चाकू गळ्यावर ठेवला अन्...

एका मुलाची आई असलेल्या 23 वर्षीय सराहची ओळख एका व्यक्तीसोबत ऑनलाईनच झाली. यानंतर दोघांनीही भेटायचं ठरवलं. सराहच्या घरीच ते दोघंही भेटणार होते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 22 जानेवारी : वेळेसोबत प्रत्येक गोष्टीची पद्धत बदलते. आधी लोक भेटून एकमेकांसोबत बोलत असे. जेव्हा एकमेकांबाबत काही भावना येईल, तेव्हा ते पुढे जात असत. मात्र, वेळेसोबत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आता लोक आधी ऑनलाईनच (Online Dating) एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यानंतर सुरू होतं एकमेकांना भेटणं. मात्र, यासोबतच अनेकदा फ्रॉड (Fraud) आणि फसवणुकीची सुरुवातही होते. नातेवाईकांनी पिशव्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकले पैसे, वरातीत नोटांचा सडा, VIDEO सोशल मीडियावर (Social Media) एका व्यक्तीसोबत ऑनलाईन डेटिंग करत असताना असंच घडलं. या व्यक्तीची ओळख सराह स्टॅनफोर्ड नावाच्या एका महिलेसोबत ऑनलाईन डेटिंग साईटवर झाली. मात्र, महिलेनं त्याचीच फसवणूक करत त्याला लुटलं. इतकंच नाही तर चाकू घेऊन, त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. ऑस्ट्रेलियाच्या गिलॉन्ग अॅडव्हर्टाइजपच्या रिपोर्टनुसार, ही घटना 27 सप्टेंबर 2019 ची आहे. एका मुलाची आई असलेल्या 23 वर्षीय सराहची ओळख एका व्यक्तीसोबत ऑनलाईनच झाली. यानंतर दोघांनीही भेटायचं ठरवलं. सराहच्या घरीच ते दोघंही भेटणार होते. सराहने त्याला औषध घेऊन येण्यास सांगितलं होतं. मात्र, हा व्यक्तीने औषध आणायचं विसरला. यानंतर सराह चाकू घेऊन आली आणि या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागली. यादरम्यान तिने या व्यक्तीच्या अकाऊंटमधून 8 लाख रुपये स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला आणि या व्यक्तीला दरमहिन्याला आपल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. तुरुंगात बसून झाला बाप; चिप्सच्या पॅकेटमध्ये पाठवायचा स्पर्म,दहशतवाद्याचा खुलासा सराहने या व्यक्तीला खुर्चीला बांधून कुत्र्याप्रमाणे भुंकण्यास सांगितलं. आपला जीव वाचवण्यासाठी या व्यक्तीला असं करावंही लागलं. यानंतर महिलेनं या व्यक्तीला एक इंजेक्शनही दिलं. कोर्टात सुनावणीदरम्यान जजने हे प्रकरण अतिशय अजब असल्याचं सांगितलं. आता संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर 28 जानेवारीला सराहला शिक्षा सुनावली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या