प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली 01 जानेवारी : कोणत्याही तरुण-तरुणीसाठी लग्न (Marriage) हा त्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. कारण दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढतात आणि अनेक नवीन नातीही जोडली जातात. यामुळे लग्नाच्या आधी प्रत्येक मुलगी आणि मुलगा असा विचार करतात की अविवाहित असतानाच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच अखेरची मजा आणि पार्टी करावी. एका तरुणानेही असंच काहीसं केलं. मात्र त्याच्या या सिक्रेट पार्टीबद्दल (Groom’s Secret Party) त्याच्या होणाऱ्या पत्नीला माहिती होताच तिने हे लग्न मोडलं. तरुणाने गर्लफ्रेंडसाठी केलेलं ते काम पाहून नेटकरी इम्प्रेस; VIDEO तुफान व्हायरल सोशल मीडिया साईट रेडिटवर नुकतंच एका महिलेनं आपलं हे दुःख सांगत लोकांकडे मदत मागितली. महिलेनं सांगितलं की तीन आठवड्यांनी तिचं लग्न होणार आहे. तिनं आणि तिच्या होणाऱ्या पतीने असं ठरवलं होतं, की लग्नाच्या आधी दोघंही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बॅचलर आणि बॅचरलेट पार्टी (Bachelor’s Party) करणार. महिलेनं सांगितलं की ती एक सुंदर ठिकाणी असलेल्या कॅबिनमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत दिवस घालवण्यासाठी गेली होती, जिथे त्या स्पाचा आनंदही घेणार होत्या. तर तिच्या होणाऱ्या पतीला आणि त्याच्या मित्रांनाही इतर कुठल्यातरी स्पामध्ये जाऊन असंच करायचं होतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार जेव्हा तिचा होणारा पती पार्टीमधून परत आला तेव्हा त्याने महिलेला सांगितलं की त्याच्या मित्रांनी त्याला न सांगताच स्ट्रिप क्लबमध्ये पार्टी (Strip Club Party) ठेवली होती. स्ट्रिप कल्ब अशी जागा असते जिथे महिला न्यूड होऊन परफॉर्म करतात. हे ऐकताच महिला भडकली. तिने आपल्या होणाऱ्या पतीला विचारलं की यासाठी मी आधीच नकार दिलेला असताना तू ऐकलं का नाही. तिचा होणारा पती तिला समजावत राहिला मात्र महिला आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली.
महिलेनं यानंतर लग्न करण्यासच नकार दिला. या व्यक्तीने तिची माफीही मागितली, मात्र आता तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. तिने सांगितलं की तिच्या बहिणीचं म्हणणं आहे की ती खूप जास्त रिअॅक्ट करत आहे. कारण तिच्या बहिणीने स्वतःच आपल्या लग्नात पतीच्या बॅचलर पार्टीसाठी स्ट्रिपर हायर केलेल्या. महिलेनं सांगितलं की तिने आपल्या नात्यात काही व्हॅल्यूज बनवल्या होत्या. ज्याच्या विश्वासावर हे नातं पुढे जात होतं. मात्र होणाऱ्या पतीने तिचं मन दुखावलं. अनेकांनी या महिलेला सोशल मीडियावर सपोर्ट केला आहे.