व्हायरल
नवी दिल्ली, 9 मार्च : कोण कधी काय करुन पैसे कमवेल याचा नेम नाही. कोणाचं नशीब कधी फळफळेल हे देखील कोणी सांगू शकत नाही. आपण विचारही करु शकत नाही असं काम करुन लोक आजकाल पैसै कमावतात. अशीच काहीशी घटना सध्या समोर आली आहे जिथे एका महिलेने चक्क च्युइंगम खाऊन पैसे कमावले आहेत. कदाचित हे वाचून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नसेल मात्र ही गोष्ट खरी आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. आपण ज्या महिलेबद्दल बोलत आहोत ती केवळ च्युइंगम चघळून महिन्याला 67 हजार रुपये कमावते. म्हणूनच असे म्हटले जाते की जर तुम्ही भाग्यवान असाल तर जर्मनीच्या ज्युलियासारखे व्हा. जी कमी कष्टात लाखो कमवायला शिकली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्युलिया दर महिन्याला फक्त च्युइंगम चावून सुमारे 67 हजार रुपये कमावते. तिने सुरुवातीला पार्ट टाईम म्हणून हे काम सुरु केलं होतं. आता ती यामध्ये फूल टाईम काम करतेय.
पार्ट टाईम सुरू केलेल्या या कामात ती इतकी कमाई करू लागली आहे की आता तिने ती पूर्णवेळ नोकरी करत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. खरं तर, ज्युलिया तिच्या तोंडात एकाच वेळी 30 च्युइंगम्स टाकून एक मोठा फुगा फुगवते. तिचे हे काम सोशल मीडियावर इतके पसंत केले जात आहे की लाखो व्ह्यूजसह ती दरमहा 67 हजार रुपये कमवत आहे. आणि त्याचा फुगा बनवत व्हिडिओ शूट करतो. हे करण्यासाठी ती फक्त 480 रुपये खर्च करते आणि या पैशातून च्युइंगम विकत घेऊन हजारो रुपये कमवते.
या आश्चर्यकारक गोष्टीची कल्पना ज्युलियाला केव्हा आणि कशी सुचली या प्रश्नाच्या उत्तरात तिने सांगितले की, एकदा तिची एक मैत्रिण गमतीने म्हणाली, च्युइंगम चावायचा आणि फुगा बनवण्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर विकत का नाही? ज्युलियाला ही आयडिया आवडली आणि तिने यावर काम करायला सुरुवात केली. तेव्हा तिला देखील ही गोष्ट माहित नव्हती की मस्तीमध्ये सुरु झालेली ही गोष्ट खूप पैसै मिळवून देईल. हळू हळू ती या कामाविषयी सिरिअस झाली.