लग्नाच्या दोन तासांतच पतीने दिला घटस्फोट
नवी दिल्ली, 15 जुलै : लग्न हे खूप पवित्र मानलं जातं. मात्र काही लोक या लग्नाची कदर करत नाहीत आणि नको त्या गोष्टींसाठी लग्न मोडतात. आत्तापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरुन लग्न मोडल्याचं पाहिलं असेल. अनेक विचित्र कारणांवरुन लोक लग्न मोडतात. अशातच एक थक्क करणारी घटना समोर आली आहे ज्यामध्ये पतीने लग्नाच्या दोन तासांतच घटस्फोट दिला. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल मात्र ही गोष्ट खरी असून सध्या जोरदार चर्चेत आली आहे. एका वराने लग्नाच्या 2 तासांनंतरच वधूला घटस्फोट दिला. एवढंच नाही तर नववधूला लग्नमंडपात सोडून ते लग्नाच्या मिरवणुकीसह घरी परतला. ही घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील आग्राच्या ढोलीखर मधील आहे. या ठिकाणी डॉली नावाच्या तरुणीचं लग्न आसिफ नावाच्या तरुणासोबत झालं. लग्न झाल्यानंतर अवघ्या 2 तासांत मुलानं घटस्फोट दिला. घटस्फोट देण्याचं कारण म्हणजे, सासरच्या मंडळींकडून हुंड्यात कार आणि दागिन्यांची मागणी त्यानं केली होती. मात्र लग्नात जवळपास 30 लाख रुपये खर्च झाल्याचे कुटुंबीय अजून हुंडा देऊ शकत नव्हते. त्यांनी अजून हुंडा देण्यास नकार दिल्यामुळे सासरच्यांनी शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. Viral Video : सापाला दोरीसारखा ओढत होता चिमुकला, पाहून घरातील लोकही पळू लागले काही वेळातच आसिफ वधूला तीन वेळा तलाक देऊन तेथून निघून गेला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नातेवाईक आणि कुटुंबीयांनी वराला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो समजून घ्यायला तयार नव्हता. या प्रकारामुळे वधूला तर मोठा धक्काच बसला. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे. दरम्यान, कोण कोणत्या कारणारुन लग्न मोडेल काही सांगू शकत नाही. वधू वर दोन्हीपैकी कोणीही कशावरुनही लग्न मोडत असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे.